esakal | पहिल्याच मुहूर्ताला कापसाला मिळाला सात हजारांचा भाव
sakal

बोलून बातमी शोधा

cotton

पहिल्याच मुहूर्ताला कापसाला मिळाला सात हजारांचा भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील गिरड रोडवरील श्री गजानन जिनिंग ॲन्ड प्रेसिंगमध्ये नवीन कापूस (cotton) खरेदीस सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी मुहूर्ताला सात हजार १०१ रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी झाली. त्यामुळे कापूस शेतकऱ्यांमध्ये (Farmers Happy)आनंद वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: मुलाचे पार्थिव नेण्यासाठी वृद्ध बाप भिक्षा मागतो तेव्हा..!

पालिकेच्या माजी नगरसेविका लता सोनार यांच्या हस्ते काटापूजन व बाजार समितीचे संचालक संजय सिसोदिया यांच्या हस्ते कापूस पूजन करून नवीन हंगामाच्या कापूस खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी यासीन बागवान, राजाराम सोनार, श्री गजानन जिनिंग संचालक प्रमोद सोनार, डॉ. दिनेश सोनार उपस्थित होते. महाराष्ट्रात कापसाला सहा हजार रुपयांचा शासकीय हमीभाव देण्यात आला असून, त्यापेक्षा जास्तीचा म्हणजे सात हजार १०१ रुपये प्रतिक्विंटल भाव खुल्या बाजारात देण्यात आला. पाचोरा येथील श्री गजानन जिनिंगमध्ये हमीभावापेक्षा जास्त रकमेने व रोखीने कापूस खरेदी सुरू करण्यात आल्याने पाचोरा व भडगाव परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा: दार्जिलिंग हिलस्टेशनमध्ये या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या..

श्री गजानन जिनिंग ॲन्ड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये सिल्लोड येथील यासीन बागवान, संजय सिसोदिया, डी. एन. पटेल, रोहित अग्रवाल यांच्या संयुक्त फर्मतर्फे कापसाची खरेदी सुरू करण्यात आली. या उद्‍घाटन सोहळ्याला नारायण पटेल, रमेश पटेल, अमीन बागवान, राहुल तायल, किरण जैन, गोपीचंद पाटील, शरीफ बागवान, योगेश राजपूत, जुबेर पठाण, इमरान शहा, गफ्फार देशमुख, इलियास बागवान आदी उपस्थित होते. शेतकरी राउफखा अय्युबखा, गोविंदा चौधरी, सुरेश चव्हाण यांचा श्री गजानन जिनिंगतर्फे शाल, टोपी रुमाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच संजय पाटील, राहुल पाटील, भय्या पाटील, संजय दीक्षित, दीपक पाटील व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी कुंदन गायकवाड, संजय खेडकर, काशीनाथ पाटील, संजय कुमार, अमोल राजपूत, अनिकेत मिस्त्री, भूषण वाडेकर, सचिन तेली आदींनी परिश्रम घेतले. प्रमोद सोनार यांनी आभार मानले.

loading image
go to top