esakal | माजी मंत्री महाजनांच्या गाडीला धडक; दुचाकीस्‍वार जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

girish mahajan car accident

माजी मंत्री गिरीश महाजन हे वरखेडी- लोहारी रस्त्याने जामनेरकडे जात असताना वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी. सी. पवार यांच्या दुचाकीची व कारची धडक झाली.

माजी मंत्री महाजनांच्या गाडीला धडक; दुचाकीस्‍वार जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जळगाव) : तालुक्‍यातील लोहरी- वरखेडी दरम्यानच्या रस्त्यावर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या कारची व दुचाकीची धडक होऊन वरखेडी (ता. पाचोरा) प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. जखमीवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माजी मंत्री गिरीश महाजन हे वरखेडी- लोहारी रस्त्याने जामनेरकडे जात असताना वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी. सी. पवार यांच्या दुचाकीची व कारची धडक झाली. आमदार महाजनांच्या कारने दुचाकीला धडक दिली असे म्हटले जात असले तरी पवार हे दुचाकीने जात असताना कारच्या मागील बाजूने ते कारवर धडकले व रस्त्यावर खाली पडून जखमी झाल्‍याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

कारमधून नेले रूग्‍णालयात
माजी मंत्री महाजन यांनी जखमी पवार यांना आपल्या कारमधून पाचोरा येथे आणून उपचारार्थ दाखल केले. पवार यांच्या डोक्यास मार लागला असून हातापायास खरचटले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. यावेळी आमदार महाजन यांच्यासह पिंपळगाव हरेश्वर येथील शिवसैनिक देविदास पाटील, भगवान पाटील, रवी गीते यांनी त्याला तात्काळ उचलले. लोहारा- वरखेडी रास्ता प्रचंड खराब असून मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे वाहन धिम्‍या गतीने चालवावे लागते. अशात त्‍या कर्मचाऱ्याला वाहन चालवण्यात अडथळे आल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून वाहनाला धडकल्‍याचे सांगण्यात येत आहे.