52 दिवस अधिकाऱ्याचे; काय केले त्‍यांनी वाचा सविस्‍तर 

संजय पाटील
Thursday, 17 December 2020

अधिकाऱ्याने ठरविले तर काहीही होवू शकते. ठरवलेच नाही तर आहे तसेच काम प्रशासनात सुरू राहते. असेच उदाहरण पारोळा पंचायत समिती कार्यालयात प्रभारी काम करणाऱ्या आयएस अधिकाऱ्याने केले. 

पारोळा (जळगाव) : पंचायत समितीत रेंगाळणारी कामे, कर्मचाऱ्यांची अनुपस्‍थिती, ग्रामसेवकांची दांडी असे अनेकाविध प्रश्‍न होते. पण आता जन्म- मृत्युची नोंद आँनलाईन पध्दतीची होणार असल्याची माहिती पारोळा पंचायत समितीचे आयएस अधिकारी तथा प्रभारी गटविकास अजय गुप्ता यांनी दिली.
त्‍यांनी सांगितले, की मागील काही वर्षापासुन सुरु झालेली प्रकिया काही तांत्रिक अडचणीमुळे उशिराने सुरु होत असली तरी यापुढे त्यात नियमितता राहुन ऑफलाईन पध्दत बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांची भटकंती बंद होवुन गावातच दाखला मिळणार असल्याने त्यांचा वेळ वाचेल.

शाळांना वायफाय कनेक्‍टिव्हिटी
तसेच तालुक्यातील 113 जि. प. शाळांना वायफाय बसविण्याची प्रकिया पुर्ण झाली असुन 31 डिसेंबरपर्यत इंटरनेट कनेक्शन जोडले जाणार आहे. यामुळे शैक्षणिक विभागात आँनलाईन प्रक्रियेस मोठा वाव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या 52 दिवसाच्या प्रभारी कार्यकाळात आयएस अजय गुप्ता यांनी प्रभावी काम करत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरोग्य, सिंचन, पशुसंवर्धन, शिक्षण, मुख्य कार्यालय अशा सर्व विभागांना थंब प्रकिया सक्तीची केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लागुन वेळेचे बंधन न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही देखील केल्‍याचे पंचायत समितीच्या इतिहासात कधी नव्हे तेवढी शिस्त 52 दिवसात दिसुन आली. 

ग्रामसेवकांना शिस्‍त
ग्रामसेवक वेळेवर येत नाही. तशा तक्रारींची दखल घेवुन त्यांना कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी नेट सेवा देणाऱ्या राऊटरचा उपयोग करणे. सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेच्या काळातील कर्तव्यावर असलेल्या ठिकाणाचे थेट लोकेशन देणे बंधनकारक केल्याने ग्रामसेवेच्या कामात कमालीची शिस्त दिसुन आली. याबाबत ग्रामसेवक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदना संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, राऊटर खरेदीसाठी पंधरा वित्त आयोगात तरतुद असुन सदर विषय हा सामंजस्याने मार्गी लावल्याचे स्पष्ट केले. 

कमी वजनाच्या बालकांमध्ये सुधारणा
तसेच महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 45 कमी वजनाच्या बाळांना सदर विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त पोषण आहार केल्याच्या सुचनेनंतर यातील 20 बालकांची तब्बेतीत सुधारणा होवुन त्यांच वजन वाढल्याचे सांगितले. तर उर्वरित 25 बालके देखील सुस्थितीत येण्यासाठी नियमित अतिरिक्त पोषण आहार द्यावा असे, आदेश देण्यात आले आहेत. सदर बालकांची नियमित आरोग्य तपासणी करुन बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी नियमित भेट देण्याच्या सुचना केल्या आहेत. 

शिस्तीचा नियमितपणा राहील का? 
आयएस अधिकारी अजय गुप्ता यांचा 52 दिवसाचा प्रभारी बीडीओचा कार्यकाळ संपत असुन त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वच विभागांना वेळेचे व शिस्तीचे बंधन लावले. थंब प्रकिया तसेच आँनलाईन व्ही. सी. मध्ये आँफलाईन राहणाऱ्यांना नोटीसा देवुन कार्यवाही देखील केल्या. त्यामुळे जे काम लोक प्रतिनिधी करु शकत नाही; ते काम एक सक्षम अधिकारी करु शकतो हे त्यांनी 52 दिवसाच्या कार्यकाळात सिध्द केले. त्यांच्याबाबत आदरयुक्त भिती ही स्पष्ट दिसत होती. त्यामुळे त्यांनी लावलेली शिस्त ही पुढील काळात टिकेल का? असा एक्ष प्रश्न चर्चला जात आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora panchayat samiti change on work in 52 days