
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय व बिर्याणी विक्री व्यवसाय बंद असल्याने त्यांनी मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवला.
पाचोरा ः प्रत्येक व्यक्तीला कोणता तरी छंद असतो व हा छंद जोपासण्याची धडपड मानव सर्वार्थाने करीत असतो. अशाप्रकारचा आगळा वेगळा छंद पाचोरा येथील रिक्षा चालक लखन सोनवणे जोपासत असून त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या आकर्षक विविध वस्तू कौतुकास्पद ठरल्या आहेत.
आवश्य वाचा- केळी पीकविम्याचा मुद्दा तापला; सुरू झाल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी !
येथील भारतीय नगर परिसरातील लखन सोनवणे यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत असून त्यांचे वडील पुंडलिक सोनवणे हे मध्य रेल्वेत नोकरीस होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी लखन वर आल्याने त्यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर शहरात सोयाबीन बिर्याणी विक्रीचा व्यवसायही केला. त्यांना चित्रकला व विविध कलाकृती बनवण्याचा लहानपणापासून छंद होता.
संसाराचा गाडा ओढत छंद जोपासला
लखन यांनी संसाराचा गाडा ओढतांना आपला हा छंद दुर्लक्षित न केला नाही. त्यात कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय व बिर्याणी विक्री व्यवसाय बंद असल्याने त्यांनी मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवला.
कोरोनाच्या फावल्या वेळात बनविल्या या वस्तू
कोरोनाच्या फावल्या वेळेत त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक व कलात्मक वस्तू साकारल्या. पृष्ठ, थर्माकोल, पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या यापासून त्यांनी कुलर, ट्रॅक्टर, मोठा पाळणा, गिटार, पियानो तसेच पाचोरा जामनेर (पीजे) रेल्वेची आकर्षक प्रतिकृती साकारली. पीजे नॅरो गेज रेल्वेचे इंजिन, त्याला जोडलेले चार डबे, डब्यातील दिवे, प्रवासी बैठक व्यवस्था अत्यंत आकर्षक व हुबेहूब रित्या त्यांनी साकारली त्यांच्या या छंदाचे व कलात्मकतेचे कौतुक होत असून परिसरातील अनेकांनी त्यांची ही कलात्मकता पाहून त्यांचे अभिनंदन केले.
संपादन- भूषण श्रीखंडे