esakal | पितृछत्राला झाली पारखी,पण गुणवत्ता राखली;पल्लवीची करुण कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

पितृछत्राला झाली पारखी,पण गुणवत्ता राखली;पल्लवीची करुण कहाणी

पितृछत्राला झाली पारखी,पण गुणवत्ता राखली;पल्लवीची करुण कहाणी

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरी


पाचोरा : प्रत्येक व्यक्ती आपापल्यापरीने आपापल्या क्षेत्रात गुणवत्ता व प्रगतीचे टप्पे गाठण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्यात यशही मिळवता येते. परंतु ज्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सारी धडपड सुरू असते तेच जर हे यश पाहण्यासाठी नसतील, तर मात्र ‘आसू अन् हसू’ची अनुभूती होते. अशीच करुण कहाणी येथील दहावी उत्तीर्ण (Passed tenth) झालेल्या पल्लवी लासूरकर या विद्यार्थिनीबाबत (Student) घडली असून, या विद्यार्थिनीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(success of tenth standard student but death of father due to corona)

हेही वाचा: रेमडेसिव्हिर उपचारातून बाद मात्र वापर सुरूच!


येथील पीटीसी शिक्षण संस्थेच्या गो. से. हायस्कूलमधील इंग्रजी विषयाचे शिक्षक शशिकांत लासूरकर यांची पल्लवी ही सुकन्या. येथील बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ती नुकतीच दहावी परीक्षेत उत्तीर्ण होऊन तालुक्यातून प्रथम आली. पल्लवीने शिक्षणासोबतच विविध कला, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम, स्कॉलरशिप, एमटीएस परीक्षा यात आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. शशिकांत लासूरकर हेदेखील अत्यंत मनमिळाऊ व सेवाभावी वृत्तीचे शिक्षक होते. शिक्षणविषयक शासकीय परिपत्रकाचा त्यांचा सखोल अभ्यास असल्याने ते सतत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून अडचणी सोडवत असत.

हेही वाचा: जनजीवन मिशनअंतर्गत राज्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पाणी!...अन्‌ होत्याचे नव्हते झाले
कोरोनाची लागण झाल्याने गेल्या २९ एप्रिलला शशिकांत लासूरकर यांचे निधन झाले. त्यामुळे पल्लवी प्रचंड खचली. समोर येऊन ठेपलेली दहावीची परीक्षा आणि ज्या वडिलांचे मार्गदर्शन लाभले व ज्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते त्या वडिलांचे झालेले निधन. अशा नियतीच्या चक्रव्यूहात पल्लवी सापडली. वडिलांच्या मृत्यूचे दुःख उराशी बाळगत तिने अभ्यासाचे सातत्य कायम राखले. तालुक्यातून प्रथम येण्याची वडिलांची इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी पल्लवीने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला व दहावीची परीक्षा दिली. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात पल्लवीने शंभर पैकी शंभर गुण मिळवून इंग्लिश मीडियममध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

loading image