भरधाव ट्रॅक्‍टरवरून चालकाने मारली उडी; यानंतर घडले थरारनाट्य

valu tractor
valu tractor

पाचोरा : चालकाविना ट्रॅक्टर धावणारे ट्रॅक्टर पळत जाऊन थांबविणाऱ्या प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या शासकीय गाडीचे चालक अजीजबेग मिर्झा यांनी केलेल्या कामगिरीचे थरारनाट्य पाचोरावासीयांनी आज अनुभवले. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः पाचोरा पोलिसात तक्रार देऊन पळून गेलेल्या ट्रॅक्‍टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांकडून ट्रॅक्टर चालकाचा शोध सुरू केला आहे. 
पाचोरा तालुका प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे हे आज (ता.२५) सकाळी पावणे अकराच्या सुमारास शासकिय वाहन बोलेरो जीप (क्रमांक एमएच १९, ५११) बांबरुड (ता. पाचोरा) येथील कोविड केअर सेंटर येथे पाहणी व भेटीसाठी जात होते. या दरम्‍यान पाचोरा- भडगाव रस्त्यावरील हॉटेल भाग्यलक्ष्मीजवळ त्यांना विना क्रमांकाचे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिसल्याने त्यांनी ट्रॅक्टर चालकास थांबण्यासाठी हात दिला. तसेच आपल्‍या वाहनावरील ध्वनिक्षेपकावरून ट्रॅक्टर थांबविण्याची सूचना दिली. यावेळी ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूने पुनगाव रस्त्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ट्रॅक्टर उतरवले व पुढे नेऊन ट्रॅक्टर सुरूच ठेवून ट्रॅक्टर चालकाने पळ काढला. 

अन्‌ काही अंतर ट्रॅक्‍टर चालले विना चालक
वाळूने भरलेले ट्रॅक्टर वरून चालकाने उडी मारत पळ काढल्‍याने ट्रॅक्‍टर चालका विना धावत राहिले. पुढे शंभर मीटरवर असलेल्या घरासमोर काही मुले खेळत असल्याचे पाहून प्रांताधिकारी कचरे यांच्या शासकिय गाडीचे चालक मिर्झा यांना शासकीय वाहन रस्त्याखाली उतरून थांबविले. यानंतर पळत जाऊन चालकाविना धावणाऱ्या ट्रॅक्टरवर चढून ब्रेक लावून ते थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. एखाद्या कथानकाला शोभेल असे हे थरारनाट्य पाचोरा वासियांनी अनुभवले. 

चालकाविरूद्ध गुन्हा
याप्रकरणी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पोलिसात तक्रार देऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणे. ट्रॅक्टर चालू स्थितीत ठेवून पळून जाणे. विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली वापरणे या कलमाखाली पळून गेलेल्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्‍टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. दरम्यान हा प्रकार  सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्यावर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले. प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामूळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्याशी संपर्क साधून झाला प्रकार जाणून घेतला. प्रांताधिकारी कचरे यांचे चालक अजिजबेग मिर्झा यांना धावते ट्रॅक्टर थांबविण्याच्या प्रयत्नात खरचटले असून त्यांचा एक्स-रे काढून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांनी या ट्रॅक्टरमधील वाळू घटना स्थळीच टाकून ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे.

संपादन : राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com