पशुधनाच्या चाऱ्याला लागली अचानक आग, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान 

संजय पाटील
Saturday, 2 January 2021

आगीमुळे तब्बल 1 लाख रुपयाचा चारा जळुन खाक झाल्याने पशुंना चारा कुठुन आणावा या विवंचनेत शेतकरी हवालदिल झाला आहे

पारोळा : तालुक्यातील मोहाडी येथील रामचंद्र लोटन पाटील यांच्या शेतातील खळ्यास शुक्रवारी साडेसात वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. 

याबाबत पोलिसात मिळालेल्या माहीतीनुसार मोहाडी येथील शेतकरी रामचंद्र पाटील यांच्या शेतगट क्रमांक 66/1 मध्ये 1 लाख रुपये किमतीचा 20 बिघे शेतातील 35 ट्रँक्टर ज्वारीचा चार्यास अचानक आग लागल्याने चारा जळतांना दिसल्यानंतर पारोळा पालिकेच्या अग्नीशामक बंबास पाचारण करुन तसेच गोरख पाटील,विठ्ठल पाटील, मुकुंदा पाटील,सागर पाटील यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.यावेळी अग्नीशामक बंब व ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु सदर आगीने रुद्ररुप धारण करित संपुर्ण चारा जळुन खाक झाला. याबाबत पारोऴा पोलिसात रामचंद्र पाटील यांच्या खबरीवरुन अकस्मात आगीची नोंद करुन तपास विजय भोई करित आहे.

पशुधनास चारा कोठुन आणावा शेतकरी चिंतेत 
काल रात्रीच्या सुमारास अकस्मात आगीमुळे तब्बल 1 लाख रुपयाचा चारा जळुन खाक झाल्याने पशुंना चारा कुठुन आणावा या विवंचनेत शेतकरी हवालदिल झाला आहे. यावेळी महसुल विभागाकडुन पंचनामा करण्यात आला असुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी रामचंद्र पाटील व ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थ आले धावून

दरम्यान मोहाडी चे माजी सरपंच रामचंद्र पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ व अग्निशामक बंब चालक मनोज पाटील व सहकाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola animal fodder fire damage farmers