अरेच्चा..पोलीस पाटीलांच्या घरीच चोरट्यांची हातसफाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thieves

अरेच्चा..पोलीस पाटीलांच्या घरीच चोरट्यांची हातसफाई

पारोळा ः पारोळा शहरातील सूर्य किरण नगर येथील रहिवाशी व कंकराज येथील पोलीस पाटील यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी (Thieves) डल्ला मारत 51 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांची थट्टा..विम्याची प्रतिगुंठा १३५ रुपये भरपाई

कंकराज ता. पारोळा येथील महिला पोलिस पाटील स्वाती पवार या मुलांच्या शिक्षणासाठी पारोळा शहरातील सूर्यकिरण नगर येथे राहतात दिवाळीनिमित्त ते बाहेर गावी गेले असल्याने त्यांच्या बंद घराचा फायदा घेत रोजी मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटात असलेले सोन्याचे मंगळसूत्र व कानातले असे सुमारे 51 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली याबाबत त्यांचे पती महेंद्र एलजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हवलदार योगेश जाधव करीत आहे.

loading image
go to top