ग्राहकांना व्हॅट्‌सॲपच्या माध्यमातून रक्कम 

संजय पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

खातेधारकांची विश्वासार्हता हीच आमच्या यशाचे द्योतक आहे. बँकेत आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम व व्हॅट्‌सॲपद्वारे पैसे काढणे यांसह अनेक योजना सुरू आहेत. पूर्वी शहरातील खातेधारकांना इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागत होते.

पारोळा : धावपळीच्या युगात खातेधारकांना तत्काळ रक्कम मिळावी, यासाठी व्हॅट्‌सॲप सुविधेतून खातेधारकांना रक्कम देण्याची सोय धरणगाव अर्बन बँकेने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया यांनी दिली. 
धरणगाव अर्बन बँकेच्या येथील शाखेत एटीएम सेवेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष आधार चौधरी, सीईओ सुशीलभाई गुजराथी, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, अमृत ग्रुपचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, ॲड. दत्तात्रय महाजन, डॉ. रवींद्र धनराळे, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, बंडू वाणी, अतुल पवार, शाखा व्यवस्थापक सचिन दौंड, शांताराम शिंदे, सचिन पाटील, ज्ञानेश्वर महाजन, पी. एल. वाणी, सचिन शिनकर आदी उपस्थित होते. 
श्री. भाटिया म्हणाले, की खातेधारकांची विश्वासार्हता हीच आमच्या यशाचे द्योतक आहे. बँकेत आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम व व्हॅट्‌सॲपद्वारे पैसे काढणे यांसह अनेक योजना सुरू आहेत. पूर्वी शहरातील खातेधारकांना इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागत होते. त्यामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर बँकेने एटीएम सेवा सुरू केली आहे. 
केशव क्षत्रिय यांनी एटीएमद्वारे पैसे काढून सेवेचा लाभ घेतला. सीईओ सुशीलभाई गुजराथी यांनी जिल्ह्यातील शाखांतर्फे खातेधारकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. खातेधारकांच्या हितासाठी बँकेचे संचालक मंडळ नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

बाजारपेठ परिसरात अनेक वर्षांपासून एटीएम सेवा नव्हती. यामुळे अनेक समस्या निर्माण व्हायच्या. परंतु धरणगाव अर्बन बँकेने खातेधारकांचा विचार व गरज लक्षात घेता एटीएम सेवेचा प्रारंभ केल्याने खरोखरच ही बाब आनंदाची बाब आहे. 
भावना मराठे, आशा ऑफसेट (खातेधारक) 

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola dharangaon arban bank costmer whatsaap cash