मद्यधुंद आयसर चालकाने सहा वाहनांना दिली धडक; तीन जखमी 

संजय पाटील
Monday, 20 July 2020

चालकाचा पाठलाग करत त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले याबाबत जखमींना खाजगी वाहनानाने कुटीर रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार्थ धुळे येथे दोन जणांना हलवण्यात आले

पारोळा: येथील महामार्गावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेत आपल्या ताब्यातील आयसर चालवत असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या सहा वाहनांना धडक दिली त्यात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.

पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास बस स्थानक जवळील हिरापूर ता पारोळा येथील पंकज बाळू पाटी (वय 23),गोकुळ वंसत पाटील (वय 21( हे आपल्या मोटरसायकलने  एम एच 19 बी एन 6522 दूध देऊन घरी परत जात असताना समोरून येणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील आयसर चालकाने विरुद्ध साईडला येऊन गाडीस जोरदार धडक दिली त्यात हे दोन्हीही जबर जखमी झाले आहेत तसेच धडक देऊन या आयसरवाल्यांने पळ काढत पुढील उभे असलेले दीपक ज्ञानेश्वर पाटील यांच्या एम एच 19 डी पी 2909 जोरदार धडक दिली व पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भूषण सुभाष चौधरी यांच्या टाटा विस्टा  एम एच 19 बी 3514 , त्याच्या शेजारील ब्रिन्झा एम एच 19 सीयू 7873 या चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली वाहनात कोणी नसल्याने जीवितहानी टाळली तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ  धनजय  संजय पाटील (वय 21) रा तरडी ता पारोळा यांच्या मोटारसायकल एम एच 19 बी पी 6796 हिस धडक देऊन चालकास जखमी केले.

याबाबत आयसर चालकाच्या अश्या कृत्याने पाहून गावातील तरुण कैलास पाटील, प्रकाश पाटील, भूषण चौधरी, समाधान धनगर आदींनी या चालकाचा पाठलाग करत त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले याबाबत जखमींना खाजगी वाहनानाने कुटीर रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार्थ धुळे येथे दोन जणांना हलवण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त कळताच शहरात बघ्यांची हायवे व पोलीस स्थानकासमोर गर्दी केली होती.

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola drunked trak driver hit six vehicles, injuring three