
समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बोरी प्रकल्पसह भोकरबारी मध्यम प्रकल्प व इतर लघुप्रकल्पात मुबलक पाणीसाठामुळे विहीरींची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली.
पारोळा : मागील वर्षी अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम पुर्णपणे वाया गेला होता.यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी विचखेडे ता.पारोळा येथील शेतकर्यांनी शिरसोदे शिवारात गहु,हरभरा,बाजरीसह पालेभाज्या पिकल्या आहेत. परंतु जंगली हरणी,निलगायी व डुकरे यांच्या हौदासामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भिती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी वनविभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
वाचा- आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू
कोरोनाच्या सावटात खरीप हंगामात तालुक्यातील शेतकर्यांनी कापुस, मका,ज्वारी, तुर,उडीद व मुग पिके घेतली होती.लाँकडाऊन काळात शेतीव्यतीरिक्त सर्वच क्षेत्रांना ताळेबंदी असल्याने मजुरांचा कल शेतीकडे होता. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बोरी प्रकल्पसह भोकरबारी मध्यम प्रकल्प व इतर लघुप्रकल्पात मुबलक पाणीसाठामुळे विहीरींची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. यामुळे शेतकर्यांनी रब्बी हंगामात गहु, हरभरा, ज्वारी, बाजरी, भुईमुग पिक शेतात घेतले. तालुक्यात रोहीत्र नादुरुस्ती मुळे अगोदर विजेचा लपंडाव सुरु असतांना जंगली जनावरांच्या हैदोसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करित आहे.
शेतकर्यांनी सकाळशी आपबिती स्पष्ट करतांना सांगितली कि,विचखेडे ता,पारोळा येथील रहीवाशी व शिरसोदे शिवारातील शेतकरी सुधाकर पाटिल,उदय पाटिल,देवीदास सोनार,भिकन पाटिल,रविंद्र पाटिल,विशाल पाटिल,संजय पाटिल,अमोल पाटिल गोरख माळी,मनिलाल चौधरी,रोहित पाटिल,मनोज चौधरी आदी शेतकर्यांनी आपल्या 10- 15 हेक्टर शेत जमिनीत रब्बी हंगामात गहु,बाजरी,मका व पालेभाज्या टाकल्या आहेत.परंतु रात्रंदिवस पहारा देत असतांना देखील जंगली हरणी,निलगायी व डुकरे यांच्यामुळे उभे पिक जमिनीखाली गेल्याने तब्बल 50 ते 60 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे शेतकरी यांनी सांगितले.
आवश्य वाचा- अतिवृष्टीने बाधित २० गावांना दिलासा; शेतकऱ्यांसाठी पाच कोटींचे अनुदान -
जीवमुठीत धरुन शेतकरी शेतात घालता गस्त
विजेच्या लपंडावमुळे शेतकर्यांना रात्रीचा दिवस करुन शेतात पिकांना पाणी द्यावे लागत असतांना पुन्हा जंगली हिस्र प्राण्यांचा हल्ला वा पिकांचे नुकसान वाचविणेकामी परिसरातील शेतकर्याना जीवमुठीत धरुन पिकांचे संरक्षण करावे लागत आहे.याबाबत वनविभागाने रात्रीची गस्त वाढवुन लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.
कोरोनामुळे प्रारंभी खरीप पिकातुन उत्पन्न मिळाले नाही.म्हणुन रब्बी हंगामात चांगले उत्पन्न निघेल या आशेने शेतात गहु,हरभरा,ज्वारी पिकांची लागवड केली.परंतु पिके वाढत असतानांच जंगली हरणी,निलगाय व डुकरे यांच्या हैदोसामुळे पिके वाढणे अगोदरच नुकसान होत आहे.याबाबत वनविभागाने शिरसोदे शिवारातील शेतांचा पंचनामा करुन पिकांची नुकसान भरपाई बाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा अशी मागणी विचखेडे येथील अमोल पाटील यांनी केली आहे.
- अमोल पाटील, शेतकरी.
आवश्य वाचा- पोलिस महानिरीक्षकांना घरफोड्यांची सलामी !
नुकसानभरपाईबाबत पाठपुरावा करु,शेतकर्यांनी काळजी घ्या
मागील वर्षी पाऊस कमी असल्यामुळे हिस्र प्राण्यांच्या वावर तालुक्यात जास्त होता.यंदा पाऊस समाधानकारक असल्याने तशी परिस्थिति कमी आहे तरी देखील शिरसोदे शिवारातील शेतकर्यांनी नुकसानीबाबत फोटो व अर्ज करुन वनविभागाकडे पाठवावे.निश्चितच याबाबत वरिष्ठांशी पाठपुरावा करुन दखल घेतली जाईल.तसेच शेतकर्यांनी हिस्र प्राण्यांपासुन सावधानता बाळगुन स्वत:ची काळजी घ्यावी.
बी एस पाटील
प्रभारी.वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग,पारोळा
संपादन- भूषण श्रीखंडे