शेतीच्या आंतरगत मशागतीसाठी "पाँवर टिलर "; ग्रामपंचायत शेतकर्यांच्या दारी 

संजय पाटील
सोमवार, 13 जुलै 2020

नगर जिल्हयासह जळगांव जिल्हयातील सदन शेतकरी हे पाँवर टिलर ने आपल्या शेताची संपुर्ण आंतर मशागतीसह वखरटी,फवारणी,गहु कापणी करतात.यामुळे कमी वेळात व कमी खर्चात अधिक उत्पन्न ते शेतातुन घेत असतात.

पारोळा  : जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील दगडीसबगव्हाण येथील शेतकर्यांनी आपल्या शेतात विक्रमी उत्पन्न घ्यावे,आत्मनिर्भय होवुन स्वत:च्या प्रगतीकडे वाटचाल करावी.या हेतुने प्रेरित होवुन येथील ग्रामपंचायतने गावातील शेतकर्यांसाठी अल्पदरात शेतातील आंतर मशागतीसाठी पाँवर टिलर आणुन ग्रामपंचायत शेतकर्यांच्या दारी हा अभिनव उपक्रम राबविल्याने शेतकर्यांसाठी योजना राबविणारी जिल्हयातील पहीलीच ग्रामपंचायत ठरु पाहत आहे.

नगर जिल्हयासह जळगांव जिल्हयातील सदन शेतकरी हे पाँवर टिलर ने आपल्या शेताची संपुर्ण आंतर मशागतीसह वखरटी,फवारणी,गहु कापणी करतात.यामुळे कमी वेळात व कमी खर्चात अधिक उत्पन्न ते शेतातुन घेत असतात. ग्रामीण भागातील शेतकरी हा बैलजोडीने पारंपारिक शेती करुन मिळेल त्या उत्पन्नावर समाधान मानतात.तसेच मध्यमवर्गीय शेतकर्यांकडे बैलजोडी व इतर साधने नसल्याने मजुरीचे दर त्यांच्याकडुन पेलवले जात नाही.या पाश्वभुमीवर गावातील शेतकर्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे.त्यांचे दरडोई उत्पादनात अधिक भर पडावी,कमी पैश्यात शेतीची चांगली मशागत होवुन पिके दमदार व कसदार असावीत.हा हेतु ठेवत ग्रामपंचायत ने शेतकरी हित जोपासत गावात पाँवर टिलर आणल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी गावात शेतकरी यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी सरपंच संगिता नंदलाल पाटील,ग्रामसेवक सुनिल पाटील,उपसरपंच साहेबराव पाटील व सदस्य श्रध्दा पाटील,कल्पना पाटील,छाया पाटील,आशा मोरे,ग्यानसीबाई वंजारी,साहेबराव पाटील,अशोक पाटील,ज्ञानेश्वर जोगी,पोलिस पाटील लहु पाटील शेतकरी नंदलाल पाटील, छोटु पाटील,रविंद्र पाटील,देविदास पाटील,किशोर पाटील उपस्थित होते.

दगडी सबगव्हाण गावात एक घर एक झाड
गावपातळीवर ग्रामपंचायत हे गावकर्यांचे मिनिमंत्रालय असते.लोकसहभाग व नेतृत्व चांगले असले कि,आपोआप गाव प्रगतीकडे वाटचाल करते.त्याचे प्रत्यक्ष उदाहरण ग्रामपंतायत दगडी सबगव्हाण यांचे देता येईल एक घर एक वृक्ष या संकल्पनेतुन गावात  तब्बल 900 अशोक वृक्षांच्या झाडाने परिसर बहरला असुन लांबुन गावाने हिरवा शालु पांघरायला असल्याचे दिसते.याबरोबर गावात सोलर वाटर हिटर,
सोलर ट्युबलाईट,चौकात कचरा पेट्या असल्याने गावाने स्वच्छतेतुन समृध्दीकडे वाटचाल केली असल्याची माहीती सरपंच संगिता पाटील यांनी सकाळला दिली.

 

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola "Power Tiller" for indoor cultivation gram Panchayat Farmers' Doors