
सन 1975 पासुन किल्ल्याचा तटबंदीचा भाग तोडुन रहदारीसाठी हा भाग तोडला गेल्याचे जाणकारांनी सांगितले.
पारोळा : येथील बसस्थानक मागील रहदारीचा शाॅटकट रस्ता वरील एतिहासीक दगडी भितींच्या बोगदा जिवघेणा ठरत असुन तो केव्हा ढासाळून मोठी दुर्घटना होईल ही सांगता येत नाही. या हा बोगदा पुरातत्व विभाग किंवा नगरपालिकेने दुरूस्त करावे अशी मागणी नागरिकांची आहे.
आवश्य वाचा- तहान भागविण्यासाठी खाली उतरला अन् जीवनच संपले; धावत्या रेल्वेत चढणे पडले महागात
पारोळा शहरातील किंवा बसस्थानकाकडून गावात जाण्यासाठी वाहनचालक, पादचारी, विद्यार्थ्यी, प्रवाशी व गृहीणींना या शाॅटकट रस्ता हा दगडी भितींच्या बोगद्यातून जाण्यासाठी सोयीचा आहे. सन 1975 पासुन किल्ल्याचा तटबंदीचा भाग तोडुन रहदारीसाठी हा भाग तोडला गेल्याचे जाणकारांनी सांगितले. यामुळे बरेच जण या मार्गातुन रहदारी करीत होते.
किल्याची भिंत धोक्यात
सदर किल्ल्याची भिंत ही पुरातन असल्याने त्याचा बराचसा भाग ढासळु लागला आहे. त्यात या भितींचा बोगद्याची अवस्था ही वाईट झाली असून बोगद्यातून ये-जा करणारे जीव धोक्यात घालून मार्ग काढत आहे. याबाबत अनेकदा नगरपालिका प्रशासनाला याबाबत तक्रार करून देखील हा एतिहासीक भितींचा हा बोगदा दुरुस्तीकडे पुरातत्व विभाग व नगरपालिकेने दुर्लक्ष केला आहे.
हेही वाचा- चिमुकली होती म्हणून वाचले आई अन् लहान बहिणीचे प्राण..घडला प्रकार भयानक
तर मोठी दुर्घटना होईल..
बोगद्यातून जाणारा मार्ग गावाला जोडला असून या बोगद्याजवळ बसस्थानक, महाविद्यालय, वसाहती जवळ आहे. त्यामुळे हा मार्ग नागरिकांना सोयिस्कर आहे. परंतू तो आता जीवघेणा झाला असून एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे