पारोळ्यात बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

संजय पाटील
Wednesday, 16 December 2020

महामार्ग लगत असलेल्या स्वामी नारायण नगर येथे मोठा रहीवास आहे.परंतु या रहीवाशी परिसरात अद्यापर्यत रात्रींची पेट्रोलिंग झालेली नाही.

पारोळा ः येथील म्हसवे शिवारातील स्वामी नारायण नगर भागात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून घरातील रोख रक्कम 40 हजार लांबवल्याची घटना घडली.

 

घराजवळ राहणारे हितेंद्र कोतवाल हे पुणे येथे आपल्या मुलाकडे घर बंद करून गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंगळवारच्या मध्यरात्री सदर घराच्या दरवाज्यास असलेले कुलूप तोडून कपाटात ठेवलेले रोख रु 40 हजार चोरी केल्याचे दिसून आले या बाबत आज राहुल शिंदे यांना हितेंद्र कोतवाल यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसल्याने त्यांना शंका आल्याने त्यांनी बघितले असता घराचे कुलूप भिंतीवर दिसून आल्याने त्यांनी फोन करून सदर घटनेची माहिती हितेंद्र कोतवाल यांना दिली. या बाबत गुन्हा नोंद होउन पुढील तपास प्रकाश चौधरी करत आहे.

महामार्ग लगत असलेल्या स्वामी नारायण नगर येथे मोठा रहीवास आहे.परंतु या रहीवाशी परिसरात अद्यापर्यत रात्रींची पेट्रोलिंग झालेली नाही.हायवे लगत पेट्रोलिंग होत असते. या परिसरात पेट्रोलिंग झाली तर रहीवाश्यांना दिलासा मिळेल.यासाठी पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी रहीवाशी धनंजय बापु मराठे यांनी दिली.

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola thieves broke into a locked house and stole