कापुस मोजणीत मापात पाप करणे भोवले; तीन जणांवर गुन्हा दाखल

संजय पाटील
Wednesday, 16 December 2020

गुडघ्याच्या साह्याने तोल ढकलून प्रति तोल दोन किलो म्हणजे क्विंटल मागे पाच किलो वजन जास्त मोजत असल्याचे समजले म्हणून याबाबत व्यापारी आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

पारोळा : मोंढाळे प्र अ (ता,पारोळा) येथे कापूस मोजणी करत असताना मापाडीने गुडघ्याच्या साह्याने जास्त कापूस मोजून मापात पाप करून कापसाची लुट करणे भोवले आहे.

आवश्य वाचा- पारोळ्यात बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला -

 मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मोंढाळे प्र अ गावी विलास रमेश पाटील यांच्या मालकीचा कापूस लहू धुडकु पाटील रा मोंढाळे प्र अ , संजय दशरथ वाणी , पारोळा यांना 5200 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे कापूस दिला होता. सदर कापूस मोजणीसाठी रावण त्र्यंबक पाटील रा. दळवेल याला मापाडी म्हणून ठेवले होते.

कापूस मोजणीत घोळ आणि शाब्दीक चकमच

गावातील दोन जणांचे कापूस भरल्यानंतर विलास पाटील यांचा कापुस ट्रकमध्ये भरण्यात येत होता चाळीस किलोच्या चवाल्याच्या साह्याने कापूस मोजला जात होता. शेतकऱ्यांचे 22 तोल झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले की मापाडी रावण त्र्यंबक पाटील हा गुडघ्याच्या साह्याने तोल ढकलून प्रति तोल दोन किलो म्हणजे क्विंटल मागे पाच किलो वजन जास्त मोजत असल्याचे समजले म्हणून याबाबत व्यापारी आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

वाचा- शासकीय खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांची तारांबळ ! -

त्यानंतर रात्री उशिराने शेतकऱ्यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिल्यावरून तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास पोलिस करित आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola three traders have been booked for tampering with the cotton census