
ग्रामपंचायतच्या निवडणुका अटी - तटीच्या होत होत्या. या निवडणुकी मुळे गiवात हेवे - दावे होत होवुन वाद विकोपाला जात होता.
पारोळा : गावकरी ते राव काय करी या म्हणीनुसार तालुक्यातील महाळपुर येथील ग्रामस्थाने तालुक्यात नवा आदर्श निर्माण करित सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित तब्बल 35 वर्षानंतर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश मिळविल्याने अनेकांकडुन नुतन सदस्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
ग्रामपंचायत स्थापने पासुन ते आज पर्यंत महाळपुर ग्रामपंतायत बिनविरोध झालेली नव्हती मात्र सुधाकर भास्कर पाटील ( पिंटूभाऊ ) यांच्या सह अनेकांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्याने गावात आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायतची स्थापना सन 1956 मध्ये झाली.यावेळी प्रथम सरपंचाचा मान दशरथ लाला पाटील यांना मिळाला होता.
बिनवीरोधसाठी प्रयत्न
तेव्हा पासुन ग्रामपंचायतच्या निवडणुका अटी - तटीच्या होत होत्या. या निवडणुकी मुळे गiवात हेवे - दावे होत होवुन वाद विकोपाला जात होता.मात्र यंदा 2020 च्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गावातील सुधाकर पाटील, सुभाष पाटील , शांताराम पाटील , नथ्थु पाटील , श्यामकांत पाटील , रामकृष्ण पाटील , संदिप पाटील , अविनाश पाटील , संतोष पाटील, गणेश पाटील , कैलास पाटील , रघुनाथ पाटील, भटू पाटील , अशोक पाटील , राजधर पाटील , प्रभाकर पाटील, अधिकार कांबळे , हरी पाटील , भावडू पाटील , मधुकर वाल्हे, नाना वाल्हे , हिरामण वाल्हे , नितिन पाटील शालीग्राम पाटील, सिध्देश्वर पाटील,दत्तु पाटील आदिनी गावात सर्वाना विश्वासात घेत हि निवडणूक बिनविरोध काढण्या साठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
बिनविरोध झालेले विजयी उमेदवार , सुधाकर भास्कर पाटील, निर्मलाबाई अविनाश पाटील, संगीताबाई कैलास पाटील, धर्मेंद्र राजाराम पाटील, सुंदराबाई भिकन कांबळे, सागर रमेश पारधी, मोहिनी संदीप पाटील, नर्मदा निंबा भिल, शांताराम गिरधर त्रिभुवन हे आहेत.यावेळी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करित नुतन सदस्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान सुधाकर पाटील यांच्या पत्नी वर्षा पाटील ह्या पालिकेच्या नगरसेविका असुन विकास कामांच्या माध्यमातुन त्यांनी प्रभागाचा विकास केला आहे.तीच परंपरा महाळपुर गावी राबविणार असुन गावातील मुलभुत कामांना प्राधान्य देत सर्व सदस्यांच्या सोबतीने काम केले जाणार असल्याचे सुधाकर पाटील यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.
जळगाव
संपादन- भूषण श्रीखंडे