परिवाराची करुण कहाणी ऐकली अन्‌ ते पोहचले घरी

संजय पाटील
Monday, 2 November 2020

भुक नसतांना खाणे विकृती आहे आणि जेवत असतांना आपल्या ताटातील घास गरीब गरजु व भुकेल्यास देणे हीच तर खरी भारतीय संस्कृती आहे. हेच तत्व आचरणात आणुन भावसार सरांनी दातृत्वाचा आदर्श निर्माण केला.

पारोळा (जळगाव) : राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडु भावसार यांनी आपल्याबरोबर निदान एक गरीब कुटुंबाचीही दिवाळी साजरी व्हावी. या उद्दात्त हेतुने दिवाळी घरखर्चाला कात्री लावुन शहरातील खांडेकर वाडा येथील रहिवाशी एकनाथ काशिनाथ वाणी यांना दिवाळीसाठी 2100 रुपयाची रोख मदत करुन पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी सिध्द करत संवेदनशीलतेचा प्रत्यय आणुन दिला.
एन. ई. एस. हायस्कुलच्या मैदानावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेसाठी 80 वर्ष वय असले एकनाथ काशिनाथ वाणी व त्यांच्या पत्नी गोळ्या- बिस्कीट व शालेय साहित्याची गाडी लावुन मुलाच्या तुटपुंज्या कमाईत हातभार लावत होते. मात्र गेल्या सात महिन्यांपासून शाळा बंद असल्याने अल्पसे उत्पन्न देखील गेल्याने वाणी कुटुंबावर कर्ज व उधारी वाढली. अशा कुटुंबाची मन हेलवणारी कहाणी ऐकुन भावसार सरांनी मागील महिन्यातही उधार व उसनवारी फेडण्यासाठी एक हजाराची मदत केली होती.

भावसार सरांकडुन दातृत्वाचा आदर्श  
कोरोनामुळे सर्वच हतबल झाले असले तरी सणासुदीत कुटुंबात काहीतरी गोडधोड किंवा नवे कपडे लत्ते करुन दिवाळी साजरी करावी असे सर्वांना वाटते. पण ज्यांच्याकडे उदरनिर्वाहसाठी पैसे नाही; ते दिवाळी कशी साजरी करणार? हे करुन दु:ख पाहुन प्रत्यक्ष वाणी कुटुंबियांच्या घरी येवुन भावसार सरांनी स्वत: च्या दिवाळी खर्च कमी करित वाणी कुटुंबियांना 2100 रुपयाची मदत केली. भुक लागली असता जेवण करणे ही प्रकृती आहे. भुक नसतांना खाणे विकृती आहे आणि जेवत असतांना आपल्या ताटातील घास गरीब गरजु व भुकेल्यास देणे हीच तर खरी भारतीय संस्कृती आहे. हेच तत्व आचरणात आणुन भावसार सरांनी दातृत्वाचा आदर्श निर्माण केला.

अन् वाणी कुटुंब गहीवरले 
उतारवयात काम होत नसल्याने मुलाच्या कमाईवर कसेबसे दिवस काढीत असतांना दिवाळी सणाला नवे कपडे व काही फराळ साहीत्य घ्यावे अशी अपेक्षा करित असतांना देवदुतसारखे भावसार यांनी पुन्हा आर्थिक मदत केल्याने वाणी कुटुंब गहीवरुन गेले. रडता रडता त्यांनी भावसार सरांचे आभार मानले.

मुलाच्या तुटपुंज्या कमाईत भागत नसल्याने उसनवारी करुन कसेबसे कुटुंब चालवित आहे.आधीच कर्ज व उसनवारी वाढल्याने त्याची चिंता त्यात दिवाळी सण कसा साजरा करावा.या विवंचनेत असतांना देवदुता सारखे भावसार यांनी आम्हांला दिवाळीसाठी मदत केली.त्यांचे उपकार मरेपर्यत विसरणार नाही.
- एकनाथ वाणी. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola wani family no income and bhavsar teacher help diwali