तापी पट्ट्यात वादळी तडाखा; केळीबागा उद्ध्वस्त !

विविध गावांतील जोडणाऱ्या रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली
तापी पट्ट्यात वादळी तडाखा; केळीबागा उद्ध्वस्त !

रावेर : तालुक्यातील तापी पट्ट्यात आज (गुरुवारी) सायंकाळी जोरदार वादळी (Storm) पावसाचा (Heavy rain) तडाखा बसला. यामुळे परिसरातील पाच- सहा गावांमधील शेतीशिवारातील केळीच्या (Banana crop) बागा जमीनदोस्त (Damage) झाल्या असून, शेतकऱ्यांच्या ऐन कापणीवर आलेल्या केळी पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. (raver district today storm heavy rain banana crop damage)

तापी पट्ट्यात वादळी तडाखा; केळीबागा उद्ध्वस्त !
जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्येतील घट कायम; संख्या दोनशेच्या आत !

तापी नदीच्या पट्ट्यात झालेल्या वादळी पावसामुळे मोठमोठे वृक्ष पडले. वाहतूक सेवा ठप्प झाली. तर विजेचे खांब वाकले. ट्रान्स्फॉर्मरचे खांबही वाकले. य मुळे परिसरातील वीजसेवा खंडित झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील सातपुडा पर्वत भागातील पायथ्याशी अहिरवाडी, पाडळे, मोहगण आदी भागात वादळी पावसाचा तडाखा बसला होता. तालुक्यातील तापी नदी पट्ट्यातील धामोडी, वाघाडी, कांडवेल, खिर्डी बुद्रुक, खिर्डी खुर्द, रेंभोटा, विटवा, निंबोल यासह परिसरातील शेती शिवारात जोरदार वादळी पाऊस झाला. ऐन कापणीवर आलेले केळी पीक आडवे होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, खिर्डी येथील मकेश महाजन, विठ्ठल पाटील, भास्कर पाटील, विनोद महाजन, विटवा येथील विजय चौधरी यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांचे केळी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यांच्या सात हजार केळीची कापणी पुढील महिन्यात सुरू होणार होती. या नुकसानीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

घरांचे नुकसान..


दरम्यान, निंबोल-ऐनपूर यांसह विविध गावांतील जोडणाऱ्या रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली होती. या परिसरातील घरांची पडझड, घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले. तापी नदी पट्ट्यात वादळी पावसामुळे विजेचे खांब वाकले. ऐनपूर- निंबोल रस्त्यावर वादळामुळे उन्मळून पडलेला ट्रान्स्फॉर्मर असलेला खांब वाकल्याने आठ ते दहा गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.


खिर्डीला सर्वाधिक फटका
वादळी पावसाचा सर्वाधिक फटका रावेर तालुक्यातील खिर्डीसह परिसराला बसला. येथे शेकडो एकर केळी बागांचे नुकसान झाले असून, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली असून, अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.

तापी पट्ट्यात वादळी तडाखा; केळीबागा उद्ध्वस्त !
कोविड, म्युकरमायकोसिसससाठी ४० तज्ज्ञांची टास्क फोर्स !

मुक्ताईनगर तालुक्याला झोडपले
मुक्ताईनगर तालुक्याला गुरुवारी सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान जबरदस्त वादळी वाऱ्याने तडाखा देत पावसाने देखील झोडपले. या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील नायगाव, पिंपरी, नांदू, शेमळदे, आदी परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमिनीवरील केळी पिकासह घरांचे देखील नुकसान झाले आहे. नायगाव, अंतुर्ली परिसराला सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांच्यासह तलाठी व पथक पाठवून सायंकाळी उशिरा पंचनाम्याची कारवाई सुरू करण्यात आल्याचे तहसीलदार श्वेता संचेती यांनी सांगितले.

(raver district today storm heavy rain banana crop damage)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com