esakal | Crop insurance ः २०१९-२० वर्षात एग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचा केळी पीक विमा काढला होता.
sakal

बोलून बातमी शोधा

FRI

पीक विमाची भरपाई न देणाऱ्या पाच बँकांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : २०१९-२० या आर्थिक वर्षात तालुक्यातील ३९ केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Banana growers) पीक विमा भरपाईच्या (Crop insurance compensation) लाभापासून वंचित ठेवल्याबद्दल तालुक्यातील ५ विविध बँकां (Bank) विरुद्ध रावेर आणि सावदा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime at the police station) करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी आणि तालुका तक्रार निवारण समितीचे सचिव मयूर भामरे यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी (Collector) यांच्या आदेशाने हे गुन्हे दाखल केले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: योजनांचा लाभ मिळवून देणारे रॅकेट सक्रिय..बोगस लाभार्थ्यांना लाभ?

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत श्री भामरे यांनी म्हटले आहे की, २०१९-२० वर्षात एग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीने केळी पीक विमा काढला होता. मात्र ३७ शेतकऱ्यांची माहिती वेळेत न भरल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खानापूर शाखा, आयसीआयसीआय बँक, रावेर शाखा आणि बँक ऑफ बडोदा, रावेर शाखा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २ केळी उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरतांना चुकीचे महसूल मंडळ पोर्टलवर भरल्यामुळे बँक ऑफ बडोदा, सावदा शाखा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया,सावदा शाखा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा: प्रेमविवाहानंतर आठवला व्यवहार; पतीसह सहा जणांवर गुन्हा

या सर्व शेतकऱ्यांना मिळून ९१ लाख ८२ हजार १८५ रुपये पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित करण्यात आले असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व बँकांना संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत ३ वेळा विचारणा करण्यात आली आणि मुदतवाढ देऊनही बँकांनी भरपाई दिली नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. एकूण ११ बँकां विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते मात्र अन्य बँकांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची पूर्तता करून दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान या दाखल केलेला गुन्हयामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

loading image
go to top