esakal | प्रेमविवाहानंतर आठवला व्यवहार; पतीसह सहा जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Police FIR

प्रेमविवाहानंतर आठवला व्यवहार; पतीसह सहा जणांवर गुन्हा

sakal_logo
By
सचिन पाटील.


शिरपूर : ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले, आईवडिलांना सोडण्याची धमक दाखवली, त्याला लग्नानंतर पतीच्या (Husband) भूमिकेत शिरताच व्यवहार आठवला. नोकरीचे (Job) पंख लागल्यावर तर त्याने छळाचा कहर केला. चार वर्षाच्या अपयशी संसाराचे दारुण दु:ख पदरी घेवून परतलेल्या युवतीने सहा जणांविरोधात शहर पोलिसांत (Shirpur City Police Station) फिर्याद दिली.

हेही वाचा: योजनांचा लाभ मिळवून देणारे रॅकेट सक्रिय..बोगस लाभार्थ्यांना लाभ?

पीडीत युवतीने प्रेमसंबंधातून चार वर्षापूर्वी विशाल तुळशीराम वाडिले (रा.शहादा जि.नंदुरबार) याच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह करुन ती सासरी गेली. सुरवातीला तिचे गोडकौतुकही झाले. त्यावेळी विशाल शिक्षण घेत होता. लग्नानंतर त्याने डीजेचा व्यवसाय सुरु केला. नुकतीच त्याला महावितरण कंपनीत नोकरी लागली.
नोकरी लागल्यानंतर विशालचा नूर आणि सूर दोन्ही बदलले.

हेही वाचा: अंजनी प्रकल्पातील जलसाठा ४४ टक्क्यांवर

माहेरून पैसे आण..

तुझ्याशी लग्न करुन मला काहीच पदरी पडले नाही. सासरकडून कवडीही दिली नाही. माझ्या समाजात लग्न केले असते तर पैसा, सोने मिळाले असते अशा कारणावरुन त्याने पत्नीचा छळ सुरु केला. त्याच्या कुटुंबानेही थाटामाटातील लग्न, मानपान यापासून वंचित राहावे लागले म्हणून तिला टोमणे देण्यास सुरवात केली. दरम्यान तिला मुलगी झाली. तरीही त्यांच्या वागणुकीत बदल झाला नाही. विशाल वाडिलेला नवीन घर घेण्यासाठी पैशांची गरज भासू लागली. मला हुंडा दिला नाही म्हणून आता तू माहेरी जाऊन पैसे घेवून ये अशी मागणी त्याने केली. मात्र माहेरशी संबंध तोडल्याने तिने नकार दिला. लॉकडाऊनच्या काळात तिच्या छळात वाढच झाली. सासरच्या लोकांनी आता विशालला नोकरी लागली आहे, त्यामुळे पत्नीशी घटस्फोट घेवून त्याचे समाजात लग्न करु, त्यामुळे चांगला हुंडा मिळेल असे सांगून तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: नंदुरबार जिल्ह्यात अपघात सत्र सुरूच;तिघांचा मृत्यू

मारहाण करून घटस्फोटाची मागणी..

विशालने जुलैमध्ये तिला बेदम मारहाण करुन घटस्फोटाची मागणी केली. घरातून हाकलून लावल्यानंतर तिने लहानग्या मुलीसह शहादा पोलिस ठाणे गाठले. तेथे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तिच्या माहेरी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर ती शिरपूरला माहेरी राहत आहे. याबाबत माहिती मिळताच ३ ऑगस्टला तिच्या सासरचे लोक शिरपूरला पोहचले. तू आमच्या विरोधात तक्रार दिली, त्यामुळे आता घटस्फोट दे अशी मागणी करुन त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने महिला सहायक कक्षाकडे धाव घेतली. त्यांनी दिलेल्या पत्रावरुन तिने शहर पोलिस ठाण्यात संशयित पती विशाल वाडिले, सासरा तुळशीराम वाडिले, सासू रत्ना वाडिले, दीर कल्पेश वाडिले, नणंद किर्ती तामखाने व नणंदोई पंकज तामखाने (सर्व रा.शहादा) यांच्याविरोधात फिर्याद दिली.

loading image
go to top