esakal | गॅज्युईटीची रक्कम जमा करण्यासाठी लाच घेणाऱ्या लिपीकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe

गॅज्युईटीची रक्कम जमा करण्यासाठी लाच घेणाऱ्या लिपीकाला अटक

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : वडिलांच्या ग्रॅज्युईटीची (Graduati) रक्कम बँक (Bank) खात्यात जमा करण्याच्या बदल्यात अडीच हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) येथील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) अधिकाऱ्यांनी लाच मागतांना पकडले. हे वृत्त कळताच येथे एकच खळबळ उडाली आहे. (public works department clerk arrested for accepting bribe)

हेही वाचा: शेतकऱ्याने दोनच महिन्यात टरबुजातून कमवीले साडे दहा लाख रुपये!

याबाबतची अधिक माहिती अशी की शेख वसीम शेख फयाज, ( वय ३० वर्षे), कनिष्ठ लिपीक, सार्वजनीक बांधकाम विभाग, रावेर (रा.मदिना कॉलनी, रावेर) यांनी लाचेची मागणी ११ जुलैला केली होती. तक्रारदार यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग, रावेर येथुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. त्याच्या ग्रॅज्युएटीची रक्कम ३ लाख ९१ हजार ७१० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात २ हजार रुपये व अर्जीत रजेची येणारी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी ५०० रुपये असे एकुण २५०० रुपये लाचेची मागणी आरोपी यांनी तक्रारदारकडे केली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचत लिपीकाला लाच स्विकारतांना रंगे हात पकडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: भुसावळ विभागातील ३६ रेल्वेगाड्या रद्द; १६,१७ ला वाहतूक बंद!

यांनी केली कारवाई

पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक श्री लोधी, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील,सुरेश पाटील,रविंद्र घुगे, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ, महेश सोमवंशी यांनी कारवाई केली.

loading image