वादळी पावसाने हिरावले घराचे छप्पर..आणि वह्या पुस्तकेही !

निर्सगाने पाटील कुटूंबाला दुहेरी संकटात टाकले.
Storm Rain Damage
Storm Rain DamageStorm Rain Damage
Updated on

रावेर : तालुक्यातील धामोडी येथे गुरुवारी (ता. २७) दुपारी झालेल्या वादळी (Storm) वाऱ्यासह जोरदार (Havy Rain) पावसामुळे रितिका पाटील या विद्यार्थिनीच्या घराचे (House) छप्पर उडून तिच्या वह्या- पुस्तकांसह घरातील संसारोपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे. (storm havi rain damage student house educational materials)

Storm Rain Damage
‘पाणी अडवा पाणी जिरवा’च्या कामांना वेग !

तालुक्यातील धामोडी या तापी (Tapi River) काठावरील गावात तिचे घर आहे. तिचे वडील वाहनचालक असून दुसऱ्यांच्या मालवाहू गाडीवर चालक म्हणून कामाला जातात. मात्र सव्वा वर्षांपासून लॉकडाऊन (Lockdown) सुरु आहे. त्यामुळे फारसे काम मिळत नाही. आर्थिक ओढताणीत (Economic crisis) तिचे शिक्षण (Education) सुरू आहे. रितिका ऐनपुरच्या सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान या वर्गात शिकत आहे. त्यातच वादळ आणि पावसाने पाटील यांच्या घराचे नुकसान केलेच सोबत मुलीच्या शैक्षणीक साहित्याचे देखील नुकसान केले. त्यामुळे निर्सगाने पाटील कुटूंबाला दुहेरी संकटात टाकले.

वादळ, पावसाने केले नुकसान

गुरुवारी झालेल्या वादळाने तिच्या घरावरील सर्व पत्रे उडून गेली आहेत तर झालेल्या वादळी पावसाने तिच्या वह्या- पुस्तकांसह घरातील अन्नधान्य व संसारोपयोगी वस्तू ओल्या होऊन वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. आता अभ्यास कसा करायचा असा प्रश्न रितिकापुढे आहे.

Storm Rain Damage
तापी पट्ट्यात वादळी तडाखा; केळीबागा उद्ध्वस्त !

रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात नुकसान

गुरूवारी आलेल्या वादळ व जोरदार पावसाने शेतीसह अनेक नागरिकांच्या घरांचे, तसेच विद्यूत वाहिनी, खांबाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. तसेच अनेक ठिकाणी मोठी वृक्ष देखील उन्मळून पडले. त्यात केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

(storm havi rain damage student house educational materials)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com