
गेटवरील पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांच्या लक्षात ही चलाखी येताच त्यांनी दोघांना प्रसाद दिला आणि नंतर फक्त उमेदवारालाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला.
रावेरः मतमोजणी केंद्रात उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी ओळखपत्र तहसील कार्यालाकडून दिले आहे. या ओळखपत्राचा दूरउपयोग करून मतदान केंद्रात प्रवेश करणाऱ्या उमेदवाराच्या दोन समर्थकांना पोलिसांचा प्रसाद खावा लागण्याची घटना रावेर मतदान मतमोजणी केंद्रावर सकाळी घडली.
आवश्य वाचा- तृतीयपंथीची विजयी कथा; अर्ज ठरविला होता बाद, पण न्यायालयालचा दिलासा आणि 'अंजली' लढली
मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना सही शिक्क्यानिशी बिल्ले देण्यात आले होते. त्यानुसार रावेर मतदान केंद्रावर मतमोजणीला सुरवात होण्यापूर्वी मतदान केंद्रावर उमेदवार व त्यांचे समर्थक येण्यासाठी लगबग सुरू झाली.
आणि अशी लढवली शक्कल
सकाळी निरूळ येथील एका उमेदवाराने आपल्या समर्थकाला मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यासाठी आपला बिल्ला हरवला असल्याचे सांगून एका समर्थकाला आपला बिल्ला दिला. आणि स्वतःबरोबर समर्थकाला मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
अन..पोलिसदादाचा प्रसाद
गेटवरील पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांच्या लक्षात ही चलाखी येताच त्यांनी दोघांना प्रसाद दिला आणि नंतर फक्त उमेदवारालाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला या प्रकाराची समोर जमलेल्या प्रचंड जनसमुदायात एकच चर्चा सुरू होती.
आवर्जून वाचा ः Gram Panchayat Results :एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटील यांच्यात झाली काटे कि टक्कर; कोथळीमध्ये अटी-तटीच्या लढतीमध्ये खडसे परिवार पॅनल विजयी
ईश्वरचिठ्ठीने विजयी...
तालुक्यातील निरूळ येथील वार्ड क्रमांक दोन मधील अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी रविंद्र किशोर खैरे आणि समाधान फकीरचंद खैरे या एकाच कुटुंबातील दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना समसमान म्हणजे 131 मते मिळाली. यावेळी रोशनी प्रकाश सूर्यवंशी रा. खामपाडा ता साक्री जि. धुळे या अकरा वर्षाच्या मुलीच्या हातून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी समाधान फकीरचंद खैरे यांना तहसीलदार उषा राणी देवगुणे यांनी विजयी घोषित केले.
संपादन- भूषण श्रीखंडे