कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्याने मिळवीले लाखोचे उत्पन्न

वासुदेव चव्हाण 
Monday, 14 December 2020

दोन एकर क्षेत्रावर तीन हजार पिलबाग खोडे ठेवली होती पिलबागाची वाढ चांगली झाल्याने घडाची फण्या छाटणी करण्यासाठी मजुरास स्टुलावर उभे राहून फण्या तोडाव्या लागल्या होत्या.

शहापूर, जामनेर : देशभरात कोरोनाचे सावट असल्याने शेतमालासह सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे मात्र अशाही स्थितीत येथील शेतकरी विजय पाटील यांनी एकरी दोन लाख रुपये केळीचे उत्पन्न घेतले आहे.

आवश्य वाचा - ..अन् बाराशे रुपयांत ‘आयजी’ 

श्री पाटील यांनी दोन एकर क्षेत्रावर तीन हजार पिलबाग खोडे ठेवली होती पिलबागाची वाढ चांगली झाल्याने घडाची फण्या छाटणी करण्यासाठी मजुरास स्टुलावर उभे राहून फण्या तोडाव्या लागल्या होत्या. तीन एकर क्षेत्रावर नोव्हेंबर 2019 मध्ये पाच हजार शंभर खोडाची लागवड केली होती लागवडीसाठी जैन ब्रदर्सचे जी 9 हे टिशूकल्चर रोपे लावली होती पिकासाठी रासायनिक खताऐवजी शेणखताचा वापर केल्याने चांगला उपयोग झाल्याचे श्री पाटील यांनी सांगितले

केळीचे घड वजनदार व सुदृढ , चांगल्या प्रतीचे व्हावे यासाठी घडाच्या खालच्या फण्या तोडल्यामुळे घडाची पोसनी चांगली होऊन माल चांगला व लवकर तयार झाला.

पाच एकरात दहा लाख उत्पन्न

दोन एकरवर पिलबाग व तीन एकरवर नवीन रोपे लागवड अशा पाच एकरवर दहा लाख रुपयांहुन अधिक रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे या पाच एकरावर शेवटपर्यंत अडीच लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यामुळे नवरात्रीपासून माल सुरू झाला व सरासरी एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahapur even in the corona crisis farmers of shahapur earned lakhs rupees