संरपच आरक्षण निघाले नाही; म्हणून इच्छुकांचा निवडणूकीवर बहिष्कार ?

एल. बी. चौधरी 
Tuesday, 15 December 2020

धुळेसह काही जिल्ह्यात ते झाले नाही. यापुर्वी बहुतांश निवडणुकीत सरपंच आरक्षण मतदानापुर्वीच काढले जाते.

सोनगीर : जिल्ह्यात 218 गावात ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून प्रभागातील उमेेदवार आरक्षण यापूर्वीच झाले आहे. मात्र सरपंच आरक्षण न निघाल्याने उमेदवार व मतदारांत नाराजी पसरली आहे. निवडणूकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढल्यास सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. आधीच सरपंच आरक्षण न काढल्यास निवडणूकीवर बहिष्कारही घातला जाऊ शकतो अशी स्थिती आहे. तसा इशारा जिल्हा परिषद सदस्या वैशाली चौधरी यांचे पती ज्ञानेश्वर चौधरी यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे. 

आवश्य वाचा- शरद पवारांच्या अपेक्षांची पंतप्रधानांकडून पूर्ती; पण विरोधक मोदीद्वेषाने पछाडले : खासदार डॉ. भामरे

राज्यातील 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार सरपंच लोकनियुक्त ऐवजी निवडलेल्या सदस्यांमधून होणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र धुळेसह काही जिल्ह्यात ते झाले नाही. यापुर्वी बहुतांश निवडणुकीत सरपंच आरक्षण मतदानापुर्वीच काढले जाते. यावेळी अद्याप सरपंचपदाचा निर्णय जाहीर न होताच निवडणूक लागली.  सरपंच आरक्षण कधी होईल हे निश्चित झाले नाही. त्यामुळे इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. तीच्या बैठकीत ठरते. 

जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत धुळे तालुक्यातील 72, साक्री तालुक्यातील 49, शिंदखेडा तालुक्यातील 63 आणि शिरपूर तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यापैकी धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना, मतदार यादी, हरकती, सुनावणी आदी कामे झाली आहेत. मात्र सरपंच आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. इच्छुकांनी मतदार याद्या मिळवल्या आहेत. पुणे, बीड आदी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सरपंच आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निवडणूकीत रंग भरणार तरी कसा? इच्छुकांची येथेच गोची झाली असून जिल्ह्यातील निवडणूकांवर परिणाम होऊ शकतो. सरपंच आरक्षण जाहीर न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जावू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. 

 वाचा- मोबदल्यासाठी खासदार, आमदार सरसावले !

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून गावाच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. नातेवाईक, जात, समाज व धर्म न बघता तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवाराच्या पाठिशी उभे राहाणे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. 
मुरलीधर मोरे, सामाजिक कार्यकर्ते सोनगीर

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songire dissatisfaction among the aspiring candidates as the reservation has not been issued