जळगाव शहरातील अग्रवाल चौकातील अंडरपास राहणार तसाच!

Jalgaon Highway Four Length : गेल्या महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापौर, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, आर्किटेक्ट शिरीष बर्वे बैठक झाली.
Underpass
UnderpassUnderpass

जळगाव : शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या (Highway Four Length )कामात अग्रवाल चौकातील भुयारी मार्ग (अंडरपास) (Underpass) सहाऐवजी १२ मीटर करण्याची मागणी होत असताना, महामार्ग प्राधिकरणाने (Highways Authority) त्याबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग तसाच सहा मीटर राहील, अशी चिन्हे आहेत. नागरिक मात्र भुयारी मार्गाची रुंदी वाढविण्यावर ठाम आहेत.

(underpass at agarwal chowk in jalgaon city will remain the same)

Underpass
पावसाच्या हुलकावणीने तिबार पेरणीचे संकट


जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता चौक या टप्प्यात चौपदरीकरण सुरू आहे. या कामात अग्रवाल चौकात भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. हा भुयारी मार्ग एकच बोगदा असलेला सहा मीटर रुंदीचा आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी येणारी वाहतूक, या परिसरात महाविद्यालये व शाळांची गर्दी यामुळे सहा मीटरचा भुयारी मार्ग अपूर्ण पडेल व वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने परिसरातील नागरिकांनी १२ मीटरचा भुयारी मार्ग करण्याबाबत मागणी केली आहे.


बैठकीत घेतला आढावा
गेल्या महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापौर, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, आर्किटेक्ट शिरीष बर्वे व नागरिकांची बैठक झाली. तीत सहा मीटरचा अंडरपास योग्य नसल्याबाबत तांत्रिक बाबी पुढे करण्यात आल्या. तसेच १२ मीटरचा अंडरपास तयार करण्याबाबत आग्रह धरण्यात आला.

Underpass
कारागृहातील ‘डबल मर्डर’मधील बंदिवानाचा मृत्यू

अद्यापही निर्णय नाही
बैठकीत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यासंबंधी विचार करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, महिना उलटल्यानंतरही त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या तांत्रिक सर्वेक्षणात प्रभात चौकात मोठा अंडरपास आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवारस्ते आहेत. त्यामुळे प्रभात चौकापासून अगदीच दोनशे मीटरवर अग्रवाल चौक असल्याने याठिकाणी पुन्हा मोठा अंडरपास देणे फिजिबल नसल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या सर्वेक्षण अहवालात नमूद आहे. त्यामुळे याठिकाणचा भुयारी मार्ग सहा मीटर रुंदीचाच राहील, असे जवळपास निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. असे असले तरी नागरिक मात्र हा भुयारी मार्ग १२ मीटर रुंदीचा व दोन भागांत विभाजित असा हवा, या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावाही सुरू आहे.

Underpass
मध्य प्रदेशातील ही आहेत सुंदर ठिकाणे..तुम्ही पाहून व्हाल थक्क


नागपूर कार्यालयाकडे प्रस्ताव
महामार्ग चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामात नव्याने बदल करायचा झाल्यास त्याला महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडून मान्यता घ्यावी लागते. अग्रवाल चौकातील या भुयारी मार्गाची रुंदी वाढविण्याबाबत नागपूर कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले जात असून, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com