शेतात खेळतांना अचानक भावंडे बेपत्ता..अज्ञातावर गुन्हा दाखल

सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
शेतात खेळतांना अचानक भावंडे बेपत्ता..अज्ञातावर गुन्हा दाखल
Updated on

यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील चार आणि तीन वर्षे वयाची दोन भावंडे (Tow Brother) बेपत्ता झाली (Missing) असून परिसरात त्यांचा शोध सुरू असून बुधवार (ता.२७) रात्री उशीरापर्यंत त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. या संदर्भात रात्री उशीरा बालकांच्या वडीलांनी (Father) बालकांचे अपहरण झाल्याबाबत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतात खेळतांना अचानक भावंडे बेपत्ता..अज्ञातावर गुन्हा दाखल
जळगावः ‘ते’ ३५ कोटी ‘रब्बी’ला ‘खरिपा’ला केव्हा?


याबाबत वृत्त असे, की तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र सावळे आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना रितेश आणि हितेश ही अनुक्रमे चार आणि तीन वर्षांची मुले आहेत. बुधवारी (ता.२७) ते आपल्या आई-वडिलांच्या सोबत दोन्ही मुले शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र दुपारी दोनपासून ती मुले दिसून न आल्याने त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला.

शेतात खेळतांना अचानक भावंडे बेपत्ता..अज्ञातावर गुन्हा दाखल
यावल: काळ्या बाजारात जाणारा तांदळाचा ट्रक जप्त



चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा दुपारपासून शोध घेण्यात येत असला तरी ते मिळून न आल्याने सावळे दाम्पत्य धास्तावले होते. या संदर्भात रात्रभर त्यां मुलांचा शोध लागला नव्हता. या संदर्भात रात्री उशीरा रविन्द्र मधुकर साळवे यांनी फिर्याद दिल्याने अखेर अज्ञात अपहरणक्रत्याच्या विरूद्ध येथील पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Marathi News Esakal
www.esakal.com