esakal | संशयीताचा मृत्यू...तरीही पॅकिंग उघडून मृतदेहाची आंघोळ; शंभर जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

कोरोना संशयित म्हणून नमुने घेण्यात आले होते. त्यांचेवर औषध उपचार सुरू असताना 29 जूनला ते मृत झाले. मृत हे कोरोना संशयित असल्याने त्यांचे मृतदेहाचे अंत्यविधी करिता योग्य त्या अटी व शर्तीसह त्यांचे मुलास मृतदेह प्लास्टिकमध्ये सुरक्षित बांधून कोणताही विधी न करता सरळ कब्रस्तानमध्ये घेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देऊन मृतदेह ताब्यात देण्यात आला. 

संशयीताचा मृत्यू...तरीही पॅकिंग उघडून मृतदेहाची आंघोळ; शंभर जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यावल : कोरपावली (ता. यावल) येथील कोरोना संशयित वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने मृताच्या मुलाने त्याचे घरी व कब्रस्तान मधील सार्वजनिक जागेवर अंदाजे 100 लोकांची गर्दी करून जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या कलम 144चे उल्लंघन केल्याप्रकरणी मृत व्यक्तीचे मुला विरूध्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना संशयित वृध्दाचा दोन दिवसानंतर (दफनविधीनंतर) अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने यावल तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

कोरपावली येथील पोलिसपाटील सलीम रमजान तडवी यांनी यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की कोरपावली गांवातील 81 वर्षीय वृद्धास 27 जूनला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांचे कोरोना संशयित म्हणून नमुने घेण्यात आले होते. त्यांचेवर औषध उपचार सुरू असताना 29 जूनला ते मृत झाले. मृत हे कोरोना संशयित असल्याने त्यांचे मृतदेहाचे अंत्यविधी करिता योग्य त्या अटी व शर्तीसह त्यांचे मुलास मृतदेह प्लास्टिकमध्ये सुरक्षित बांधून कोणताही विधी न करता सरळ कब्रस्तानमध्ये घेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देऊन मृतदेह ताब्यात देण्यात आला. 

जे नको ते केले 
मृतदेह त्यांचा मुलगा, तीन जवळचे नातेवाईक व इतर नातेवाईकांनी मृतदेह थेट कब्रस्तानमध्ये न नेता घरी घेऊन जाऊन मृतदेहाचे बांधलेले प्लास्टिक सोडून मृतास आंघोळ घातली. त्या वेळी सदर ठिकाणी जवळचे नातेवाईक व इतर जवळपास 100 लोक मृतदेहाचे अंत्यविधीसाठी जमलेले होते. त्यांनी लॉकडाऊन व संचार बंदीचा नियम मोडून मृत जेष्ठ वृध्दावर दफनविधी केला. त्यामुळे पोलिसपाटील सलीम तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात मृत व्यक्तीच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image