साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपुन घरी निघाले आणि घडली भयंकर घटना 

राजू कवडीवाले
Monday, 16 November 2020

यावल येथे साखरपुडयाच्या कार्यक्रमास सहभाग घेण्यासाठी आपली पत्नी जुलैखा अन्जुम यांच्या सोबत आले होते.

यावल : तालुक्यातील निमगाव गावाजवळ चारचाकी वाहन आणी दुचाकी वाहनात झालेल्या भीषण अपघातात सहाय्यक फौजदाराचे जेष्ठ बंधु मृत झाल्याची घटना घडली. या घटनेत एक महीला गंभीररित्या जख्मी झाली आहे. 

आवश्य वाचा- नात्याला काळिमा फासणारी घटना ;चुलत काकाने पुतणीवर केला अत्याचार ! -

यावल येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान पठान यांचे जेष्ठ बंधु ईस्हाक खान समशेर खान (वय 72 रा.आझादनगर, भुसावळ) हे यावल येथे साखरपुडयाच्या कार्यक्रमास सहभाग घेण्यासाठी आपली पत्नी जुलैखा अन्जुम यांच्या सोबत आले होते.  साखरपुडयाचा कार्यक्रम आटोपुन ते सोमवारी सायंकाळी 6.30 ते 7 च्या सुमारास भुसावळ येथे आपल्या गावी निघाले.

चारचाकी वाहनाने दिली धडक

भुसावळकडुन येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच 03 डीएच5827) या वाहनाने निमगाव जवळ यावल हुन भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक ( एमएच 19 एएफ5094 )धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात त्यांचा मृत्यु झाला असुन, त्यांच्या पत्नी जुलैखाबी अन्जुम या अपघातात गंभीर जख्मी झाल्या आहेत. याबाबत येथील पोलीस ठाण्यात मयताचा मुलगा नाजीम खान ईस्हाक खान यांनी फिर्याद दिल्याने अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal One died in a two-wheeler accident