esakal | ज्येष्ठ, दिव्यांगाना ‘निअर टू होम’ लस द्या!
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

ज्येष्ठ, दिव्यांगाना ‘निअर टू होम’ लस द्या!

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव ः
ज्येष्ठ व दिव्यांगांना कोरोना (corona) लसीकरणासाठी अडचणी येऊ नये, यासाठी त्यांना ‘निअर टू होम’ (Hoom to Near) अर्थात घराजवळ जाऊन लस द्यावी, अशी सूचना आरोग्य विभागाने (Department of Health) जिल्हा आरोग्य यंत्रणेला (District Health) दिल्या आहेत. याअंतर्गत संबंधित गाव, शहराच्या प्रत्येक परिसरात, कॉलनीत लसीकरण शिबिरे घेणे अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणात (corona vaccination) ज्येष्ठ व दिव्यांगांना अगोदरपासूनच प्राधान्य दिल्याने त्यांचे लसीकरण ९५ टक्क्यांवर झाले आहे. यामुळे पुन्हा लसीकरण (vaccination)केंद्र सुरू करणे परवडणारे नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

( senior citizen crippled citizen hoom to near vaccination helth department information)

हेही वाचा: धुळ्यात रक्ताचा तुटवडा; ‘हिरे’च्या रक्तपेढीत फक्त दहा बाटल्या शिल्लक

फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण झाल्यानंतर शासनाने ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोहीम राबविण्यास सांगितली होती. तेव्हापासून ती मोहीम सुरूच आहे. नंतर १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. तेव्हाही ज्येष्ठ व दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले. आताही ४५ वयोगटांवरील सर्वांचे लसीकरण सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे ज्येष्ठ व दिव्यांगाचे ९० ते ९५ टक्के लसीकरण झाले आहे. पाच ते दहा टक्के शिल्लक आहेत. त्यांना लसीकरणाबाबत शंका-कुशंका आहेत. यामुळे त्यांनी लस घेतलेली नाही.

हेही वाचा: ‘वसाका’त हजार टन ऑक्सिजननिर्मिती शक्य!

आतापर्यंत झालेले लसीकरण असे
पहिला डोस घेतलेले : सहा लाख ७६ हजार ९२३
दुसरा डोस घेतलेले : एक लाख ७३ हजार ९३२
एकूण लस घेतलेले : आठ लाख ५० हजार ८५५

कोरोना लसीकरणात दिव्यांग व ज्येष्ठांना आपण नेहमीच प्राधान्य देत आलो आहोत. रांग कितीही मोठी असली तरी त्यांच्यासाठी वेगळी रांग असते. यामुळे त्यांना लसीकरणात अडचणी येत नाहीत. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ वयोगटांवरील सर्वांनाच लसीकरण झाले आहे. जवळपास ९० ते ९५ टक्के ज्येष्ठ व दिव्यांगांना लसीकरण झाले आहे.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

loading image