esakal | ‘वसाका’त हजार टन ऑक्सिजननिर्मिती शक्य!
sakal

बोलून बातमी शोधा

‘वसाका’त हजार टन ऑक्सिजननिर्मिती शक्य!

‘वसाका’त हजार टन ऑक्सिजननिर्मिती शक्य!

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव : एरंडोल येथील वसंत सहकारी साखर कारखान्यातील ( vasant cooperative sugar factory) डिस्टलरी युनिट सुरू केल्यास त्यातून एक हजार टन ऑक्सिजनची (Oxygen) निर्मिती होऊ शकेल. शासनाच्या ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ अंतर्गत उद्योजक कंपन्यांना त्यासंबंधी निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ( vasant sugar factory oxygen plant)

हेही वाचा: येऊ द्या आपत्ती,आम्ही आहोत सतर्क; शोध बचाव पथके तयार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त करून साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करावी, अशी सूचना केली होती. राज्य शासनाने त्यादृष्टीने ऑक्सिजन स्वावलंबन योजना हाती घेतली आहे.

तेराशे टन निर्मिती
त्या अन्वये दररोज एक हजार ३०० टन ऑक्सिजननिर्मिती होत आहे. ही निर्मिती तीन हजार टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सक्रिय रुग्ण दहाच्या आत

वसंत कारखान्याची क्षमता
आता ‘मिशन ऑक्सिजन स्वालंबन’अंतर्गत राज्याला ऑक्सिजननिर्मितीच्या दृष्टीने स्वावलंबी बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आले असून, वसंत सहकारी साखर कारखान्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी खूप आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या उद्योजक कंपनीला यासंदर्भात आदेश दिले असून, या कारखाना कार्यक्षेत्रात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने प्लांट उभारणीसाठी कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.

loading image