esakal | जळगाव जिल्ह्यात जुलैत ‘मे हीट’ चा चटका;तापमान चाळिशी पार!
sakal

बोलून बातमी शोधा

Temperature

जळगाव जिल्ह्यात जुलैत ‘मे हीट’ चा चटका;तापमान चाळिशी पार!

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव : केवळ येण्याची वर्दी देऊन गायब झालेल्या मॉन्सूनच्या (Monsoon) पावसाने (Rain) चिंता वाढविली आहे. आता ऐन जुलैत नागरिकांना ‘मे हीट’च्या चटक्याचा अनुभव येतो. जिल्ह्यात तापमानाने (Temperature) चाळिशी पार केली असून, उकाड्याने त्रस्त नागरिकांना घामाच्या धारांनी हैराण केल्याचे चित्र दिसतेय. (due to lack of rain but temperature in Jalgaon district increased)

हेही वाचा: मंत्रिपदाचा राजीनामा..पक्षत्याग..‘ईडी’ची चौकशी


यंदा देश व राज्यात मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली. ज्या धडाक्यात मॉन्सूनचा पाऊस आला तो पाहता पावसाळा सुसह्य जाईल, असे चित्र होते. जळगाव जिल्ह्यात मात्र मॉन्सूनने केवळ वर्दी देऊन पलायन केले. तुरळक स्वरूपाचा पाऊस तेवढा झाला. मात्र दोन आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट उभे केले असून, शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

Temperature

Temperature

तापमानाचा पारा वाढला
एकीकडे दुबार पेरणीचे संकट आणि दुसरीकडे पाणीटंचाईचे सावटही जिल्ह्यावर आहे. ऐन जुलैत प्रकल्पांमधील साठा कमी होऊन टँकरची संख्या पाचवरून आठ झाली आहे. तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची काहिली होत असल्याचा अनुभव येत आहे. गेल्या दोन दशकांत प्रथमच जुलै महिन्यात कमाल तापमानाने ४० चा आकडा पार केल्याची नोंद नुकतीच झाली. ‘मे हीट’चा कडाका या उन्हाने जाणवत असून, वातावरणात आर्द्राताही वाढल्यामुळे उकाडा वाढून घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा: जळगाव मनपातील 27 बंडखोर नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

कुलर, एसी सुरूच
जून महिन्यात दोन- तीन वेळा पावसाने हजेरी लावल्यानंतर एसी, कुलरचा वापर कमी होतो. यंदा मात्र एसी, कुलरचा वापर कमी झालेलाच नाही. उलटपक्षी जुलैत या उपकरणांचा वापर वाढल्याचे दिसत आहे. अगदी सकाळी अकरापासूनच कुलर सुरू होत असून, रात्री तापमानाचा पारा घसरत असला तरी उकाडा कायम असल्याने कुलर, एसी सुरूच असतात.

उन्हात खरेदीची गर्दी
उन्हाने जिवाची काहिली होतेय. घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त असताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या बाजारपेठेतील निर्बंधांमुळेही नागरिक हैराण आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेतील दुकाने, संकुले दुपारी चारपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दुकाने सकाळी दहाला सुरू होऊन दुपारी चारला बंद होत असल्याने ऐन उन्हाच्या वेळी दुपारी १२ ते ४ या वेळेत बाजारपेठेत प्रचंड गर्दी होते. प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होते. उन्हाने त्रस्त नागरिकांना या कोंडीलाही सामोरे जावे लागत असल्याने दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.

loading image