मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ

पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा
Married women Harassment
Married women Harassmentsakal
Updated on

यावल - येथील माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेचा मुलगी झाली म्हणून छळ करीत कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. या पैशांची पूर्तता न केल्याने विवाहितेस माहेरी सोडून दिले म्हणून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील प्रणाली राहुल आमोदकर (वय २४) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे लग्न ३० एप्रिल २०१८ ला राहुल नोमदास आमोदकर (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांच्यासोबत येथे झाले होते. लग्नानंतर विवाहिता रहिमतपूर येथे नांदण्यास गेली व १४ जुलै २०१९ ला तिला मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून तिचा पती व सासरच्या लोकांकडून छळ होऊ लागला. तसेच छोट्या छोट्या कारणावरून पतीकडून शिवीगाळ, मारहाण होऊ लागली. तसेच तिला पती व सासरच्या मंडळींनी वाहन कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे, म्हणून तिला त्रास द्यायला सुरवात केली. व पैसे न दिल्याने विवाहितेला माहेरी यावल येथे सोडून दिले.

या प्रकरणी विवाहितेचा पती राहुल आमोदकर, सासरे नोमदास नथ्थू आमोदकर, सासू नलिनी नोमदास आमोदकर, जेठ विकास नोमदास आमोदकरी व इंताजबाई शौकत सय्यद अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान दिलावरखान, नितीन चव्हाण, हवालदार बालक बाऱ्हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Yogesh Nemade
Marathi News Esakal
www.esakal.com