Market Committee Election : महाआघाडी, भाजपच्या उमेदवारीकडे लक्ष; ग्रामीण भागात प्रचार शिगेला

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal

भिकन वाणी : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. (Market Committee Election Campaigning began in rural areas focusing on candidature of maha vikas aghadi and BJP jalgaon news)

त्यासाठी कोणते उमेदवार द्यायचे, याची चाचपणी केली जात असून, येत्या दोन दिवसांत अंतिम चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, राष्ट्रवादी -काँग्रेस-शिवसेना (उद्धव ठाकरे) या महाआघाडीच्या नेतेमंडळींचे उमेदवार ग्रामीण भागात प्रचार करताना दिसत आहेत.

एकूण १८ जागांसाठी येत्या २८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार देताना विचारपूर्वक निर्णय घेऊन उमेदवारी देण्याकडे सर्वपक्षीय नेतेमंडळींचा कल दिसून येत आहे. एकूण २०९ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. त्यामध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा गुरुवारी (ता.२०) शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत फक्त तीन उमेदवारी अर्ज माघार घेतले गेले आहेत.

सोसायटी गटांत सर्वात जास्त ११ जागा असून, त्यामध्ये (सर्वसाधारण) गटातून सात, महिला राखीव दोन, इतर मागास प्रवर्ग एक व भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग एक यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात एकूण ४ जागा असून, त्यामध्ये सर्वसाधारण २, आर्थिक दुर्बल १, अनुसूचित जाती जमाती १ अशा जागांचा समावेश आहे.

व्यापारी, हमाल मापाडी गटात चुरस

व्यापारी मतदारसंघात २ जागा असून, एकूण १७ उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत. एकूण १५७ मतदार आहेत. त्यामध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांचे ४, ज्ञानेश्वर चौधरी, चंद्रकांत चौधरी व नीलेश वाणी यांचे प्रत्येकी २ आणि अनिल चौधरी, सिद्धार्थ देशमुख, रणजित देशमुख, भूषण कोठावदे, राजेंद्र मांडे व सुनील गायकवाड यांचा प्रत्येकी एक अर्ज असे दोन जागांसाठी फक्त १० उमेदवारांनी अर्ज भरले असून, महाविकास आघाडीकडून शेतकरी विकास पॅनलचे बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रदीप देशमुख व आडत व्यापारी अनिल चौधरी या दोन नावांवर व्यापारी संघटनेच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee Election : 11 जागांवर शिंदे गट, 7 जागांवर ‘भाजप’ लढणार

भाजपकडून भूषण कोठावदे, नीलेश वाणी, ज्ञानेश्वर चौधरी व चंद्रकांत चौधरी या चार नावांपैकी दोन नावांवर निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी सोमवारी (ता. १७) घाटरोडला व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. हमाल मापाडी गटातून एका जागेसाठी शेनपडू पिलोरे व प्रभाकर घुमरे यांचे दोन अर्ज, दत्तात्रय भामरे, शिवाजी डोखे, अतुल चव्हाण, शिवाजी ठाकरे ह्यांचा प्रत्येकी एक अर्ज, असे सहा उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. या गटात एकूण १५७ मतदार आहेत.

चाचपणीसाठी बैठकांचा सपाटा

महाविकास आघाडी व भाजपच्या गेल्या १५ दिवसांमध्ये उमेदवारी चाचपणीसाठी अनेक बैठका झाल्या. बाजार समितीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यामुळे उमेदवारी देताना भविष्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊनच उमेदवारी दिली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अंतिम चित्र दोन दिवसानंतर स्पष्ट दिसणार आहे.

Jalgaon Market Committee election
Pachora Market Committee Election : राजकीय वणवा...! माघारीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मनधरणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com