Pachora Market Committee Election : राजकीय वणवा...! माघारीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मनधरणी

Pachora Agricultural Produce Market Committee
Pachora Agricultural Produce Market Committee esakal

Pachora Market Committee Election : पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज माघारीसाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने अर्ज (Jalgaon News) माघारीसाठी तीनही पॅनलच्या नेत्यांना आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनधरणी करून कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. (leaders of all 3 panels have to work hard to persuade their office bearers and workers for Application withdraw jalgaon news)

त्यामुळे रुसवे फुगवे, आरोप प्रत्यारोप, नाराजी, मतभेद, आश्वासने यात वाढ झाली आहे. बाजार समितीच्या सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमालमापाडी या राखीव मतदारसंघासाठीच्या १८ जागांसाठी २३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

त्यापैकी तीन अर्ज उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, इतर दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २२९ उमेदवारी अर्ज आहे. अर्ज माघारीची मुदत अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवार नेमके कोण निश्चित होणार? कोणावर माघारीचे संकट येणार? याबाबतच्या चर्चा, प्रतिक्रिया व खलबते सुरू झाल्याने राजकीय वणवा वाढला आहे.

बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस या चारही पक्षांच्या वतीने स्वबळाचा नारा देत पदाधिकारी व इच्छुकांचे मेळावे, इच्छुकांच्या मुलाखती व उमेदवार निश्चिती अशी प्रक्रिया होऊन चारही पक्षाच्या नेत्यांनी स्वबळाचा विचार करून आपले १८ उमेदवारांचे पॅनल प्राथमिक स्तरावर निश्चित केले होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Pachora Agricultural Produce Market Committee
Jalgaon News : मनपा निधी नियोजनासाठी आयुक्तांची कसोटी; कर्जमुक्तीमुळे महापालिका आर्थिक सक्षम

दरम्यानच्या काळात सर्वच पक्षांनी एकमेकांशी हातमिळवणी करण्यासाठी बोलणे केले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होते की काय? असे चित्र निर्माण झाले होते. परंतु पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेश, पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाची निवडणुका संदर्भातील आचारसंहिता या बाबी विचारात घेऊन नेते मंडळींनी हालचाली सुरू केल्या होत्या.

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ हे एकत्र राहतील, अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू होती. आमदार किशोर पाटील यांनी तसे जाहीरही करून टाकले होते. परंतु दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदांसह मेळाव्यांमधून त्याबाबत स्पष्टीकरण देऊन आमदार किशोर पाटलांनी केलेले विधान खोडले होते.

त्यानंतर हालचालींना कमालीचा वेग आला व दिलीप वाघ यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचा निर्धार करत उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी व काँग्रेसचे प्रदीप पवार, सचिन सोमवंशी यांचे सोबत महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधून संयुक्त पत्रकार परिषदेसह मतदारांचा मेळावा घेतला.

Pachora Agricultural Produce Market Committee
Jalgaon Market Committee Election : 11 जागांवर शिंदे गट, 7 जागांवर ‘भाजप’ लढणार

दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांनी भाजप माझ्यासोबत असून, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची भाजप डुप्लिकेट आहे, असे स्पष्ट केले होते. परंतु भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे (पाचोरा ) व अमोल पाटील (भडगाव) व शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी संयुक्त पत्रक प्रसिद्ध करून भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजप स्वतंत्रपणे लढत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता महाविकास आघाडी, भाजप व शिवसेना (काही भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत) बाजार समितीच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे तिरंगी लढत सुस्पष्ट झाली आहे.

आघाडी अभेद्य युतीला ग्रहण

बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांच्यासह समविचारी पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असल्याने आघाडी अभेद्य राहिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे अमोल शिंदे, सतीश शिंदे यांनी दंड थोपटले आहेत.

आमदार किशोर पाटील यांचेसोबत भाजपचे माजी जिल्हापरिषद सदस्य मधुकर काटे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील व त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे सेना भाजप युतीला ग्रहण लागल्याचे चित्र आहे.

प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

दरम्यान, प्रचारात बाजार समितीची गतकाळात विकली गेलेली जागा, आणखी जागा विक्रीचा घातलेला घाट, मोंढाळा रस्त्यावर बाजार समितीचे करण्यात येणारे स्थलांतर, बाजार समितीवरील कर्जाचा डोंगर, समितीतील असुविधा अशा विविध मुद्द्यांचा वापर होत असून, तीनही पॅनलच्या वतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

Pachora Agricultural Produce Market Committee
Jalgaon Market Committee Election : महाविकास आघाडीच्या पॅनलच्या 99 टक्के जागावाटप एकमताने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com