Latest Marathi News | विवाहितेने मृत्यूला कवटाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide news

Jalgaon News : विवाहितेने मृत्यूला कवटाळले

जळगाव : शहरातील तांबापुऱ्यातील २२ वर्षीय विवाहितेने बुधवारी (ता. २८) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या माहेरच्या मंडळींनी पतीसह सासरच्या लोकांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली आहे.

तांबापुऱ्यातील विवाहिता सना कौसर फिरोज शेख (वय २२) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. माहेरच्या मंडळींनी सना कौसर हिच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली.

पती व सासूच्या जाचाला कंटाळून सना कौसर हिने मृत्यूला कवटाळल्याचा आरोप करत सासरच्या मंडळीला अटक करण्याची मागणी करत गोंधळ घातला, तसेच गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा घेतला. (Married Women attempt suicide by torture of In laws Jalgaon Crime news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Nashik News : कलगी-तुरा मधील ‘झिलक्या’ पात्र साकारणारे यशवंत बाबा; वयाच्या सत्तरीत आवाज खणखणीत!

गुरुवारी (ता. २९) सकाळपासून सना कौसर हिच्या माहेरच्या मंडळींनी जिल्‍हा रुग्णालयात गर्दी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, रवींद्र गिरासे, कर्मचारी इम्रान सय्यद, अतुल वंजारी यांच्यासह पोलिसांनी संतप्त नातेवाइकांची समजूत काढली व गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेण्याचे आश्‍वासन दिल्यावर वाद शांत झाला.

एमआयडीसी पोलिसांनी संशयित पती फिरोज शेख युनूस शेख कुरेशी (वय२५), सासू जैनब शेख युनूस शेख कुरेशी (४५) या दोघांना अटक केल्यावर नातेवाइकांनी मृतदेहाच्या शवविच्छेदनाची परवानगी दिली. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

इन-कॅमेरा शवविच्छेदन

मृत विवाहिता सना कौसर हिचे वडील सलीम खान लतिफ खान (वय ४०, रा. पवारवाडी, मालेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांचा जावई फिरेाज शेख युनूस (वय २५), त्याची आई जैनब (वय ४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नंतर मृत सना कौसर हिचा मृतदेहाचा नायब तहसीलदार जाधव यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. वैद्यकीय समिती समक्ष इन-कॅमरेा शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेतल्यावर मालेगाव येथे तिच्या माहेरी तिच्यावर अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: SAKAL Impact News : उद्यान दुरूस्तीच्या हालचालींना वेग; समस्या सोडविण्यास सुरवात