SAKAL Impact News : उद्यान दुरूस्तीच्या हालचालींना वेग; समस्या सोडविण्यास सुरवात

cleaning work start
cleaning work startesakal

सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरातील उद्यानांच्या दुरवस्थेबाबत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या ‘आम्ही खेळायचं कुठे? या सदरामुळे सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व उद्यान ठेकेदार यांनी उद्यानातील समस्या सोडवण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी उद्यान दुरुस्तीसाठी हालचालींना वेग मिळाला आहे. (Speed ​​up park repair movement Start solving problem sakal impact Nashik News)

esakal

उद्यानातील समस्या आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बालगोपाळांना उद्यानात जाणवणाऱ्या समस्या सुटण्यास सुरुवात झाली असून, उद्यानात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

उद्यानातील कचरा वेळोवेळी घंटागाडीमध्ये टाकून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. उद्यानातील गाजर गवत काढण्यासाठी उद्यान विभागास वेळ मिळू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, उद्यानं नेहमी अशाच स्थितीत राहावित, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

cleaning work start
Nashik News: ‘सावाना’ च्या 1 लाख 42 हजार पुस्तकांच्या सूची लिंकचे प्रभावळकरांच्या हस्ते लोकार्पण!
esakal

"‘सकाळ माध्यम समूहा’च्या माध्यमातून परिसरातील उद्यानाच्या समस्या मांडण्यात आल्या होत्या. या समस्या हळूहळू सुटण्यास सुरवात झाली आहे. उद्यानांमध्ये स्वच्छता अभियानास सुरवात करण्यात आली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे." -दीपाली महाजन (गृहिणी)

"उद्यानात असलेले पथदीप अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत होते. उद्यान विभागामार्फत हे पथदीप आता सुरू झाले असून, उद्यानात मोठ्या प्रमाणावर उजेड पडत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लहान मुलांना रात्रीच्या वेळीसुद्धा उद्यानात खेळण्यासाठी पाठवू शकणार आहोत, याचे समाधान आहे."- प्रमिला पाटील (गृहिणी)

"उद्यानातील समस्या सोडवण्यास खऱ्या अर्थाने सुरवात झाली असली, तरी उद्यान विभागाने गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे. यामुळे मद्यपिंनाही वचक बसणार असून, प्रेमीयुगुलांचेही उद्यानात येणे-जाणे कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे".- अर्चना नेरकर (गृहिणी)

cleaning work start
Kamgar Kalyan Natya Spardha : यंदा 24 नाटकांची रसिकांनी मेजवानी! तिसरी घंटा वाजली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com