घराचा दरवाजा उघडताच...समोर दिसली दुर्दैवी घटना, मायलेकाचे आढळले मृतदेह !  ​

घराचा दरवाजा उघडताच...समोर दिसली दुर्दैवी घटना, मायलेकाचे आढळले मृतदेह !  ​

भुसावळ  : शहरातील रेल्वेच्या गंगोत्री कॉलनीत मायलेकाचा मृतदेह आज (ता. २८) सकाळच्या सुमारास आढळून आला. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. मृत्यूचे कारण मात्र गुलदस्त्यात असून, शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

शहरातील आरपीएफ कार्यालयाशेजारील गंगोत्री कॉलनीतील रेल्वे क्वार्टर क्रमांक आर. बी. १/ एच. ६६२ मधील रहिवासी तथा रेल्वे सिनिअर सेक्शन इंजिनिअर फ्रान्सीस डॅनियल पाटेकर यांच्या घराजवळ दुर्गंधी येत होती. परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला माहिती कळविली असता, रेल्वे व पोलिस प्रशासनास माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घरात फ्रान्सीस डॅनियल (वय अंदाजे ५५) व त्याची आई (वय अंदाजे ७० ते ७५, नाव माहीत नाही) यांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह पालिका रुग्णालयात पाठविण्यात आले. आई व मुलाचे मृताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मृतदेह आढळल्याने परिसरात तसेच जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com