आधी वडिल,नंतर आजोबा आता आईचा मृत्यू,असे संकट पाहणाऱ्या जलतरणपटूची करूण कहाणी!

माझी आई जिवंत आहे का? या चिंतेत होत असलेली घालमेल मात्र सगळ्यांना सुन्न करणारी
आधी वडिल,नंतर आजोबा आता आईचा मृत्यू,असे संकट पाहणाऱ्या जलतरणपटूची करूण कहाणी!

जळगाव : सहा महिन्यांपूर्वी वडिलांचा (father) अपघाती मृत्यू (death) ..तर मुलाच्या विरहात आजोबांचा सोळा दिवसांतच हृदयविकाराने मृत्यू झाला...त्यातच शुक्रवारची ती काळरात्र तेरा (Grandfather) वर्षीय चिमुरड्यावर आघात करणारी ठरली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत मातृछत्रच (Mother) हरपले अन् एका उगवत्या जलतरणपटूचे (Swimmer) स्वप्न (Dream) धूसर झाले...

(father Grandfather and mother death then bad story of swimmer)

आधी वडिल,नंतर आजोबा आता आईचा मृत्यू,असे संकट पाहणाऱ्या जलतरणपटूची करूण कहाणी!
हॉटस्पॉट ठरलेले जळगाव शहर नियंत्रणात.. केवळ सोळा नवे बाधित

जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरातील मयूर कॉलनीत शुक्रवारी कौटुंबिक वादातून दिराने वहिनीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या घटनेमुळे संपूण परिसर हादरला. या घटनेत प्रत्यक्ष आईवर वार होताना पाहणारा तेरा वर्षीय चिमुरडा माझी आई जिवंत आहे का? या चिंतेत होत असलेली घालमेल मात्र सगळ्यांना सुन्न करून टाकणारी होती. लहानपणापासून आर्यनला स्वीमिंगची आवड असल्याने त्याला उत्तम जलतरणपटू बनविण्याचे स्वप्न मयत मुकेश सोनार व योगिता सोनार यांनी पाहिले होते. पण सहा महिन्यांपूर्वी वडील मुकेश सोनार यांचा यावल येथे अपघातात मृत्यू झाला आणि सोनार घराला जणू दृष्टच लागली.

अशी घडली घटना...

शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर नऊच्या सुमारास संशयित आरोपी दीपक सोनार हा मृत भाऊ मुकेश सोनार यांच्या काही फाईल्स बघत होता. या वेळी वहिनी योगिता मुकेश सोनार (वय ३९) यांच्याशी वाद झाला. संतप्त दीपकने पलंगामागून कुऱ्हाड काढली आणि योगिता यांच्या डोक्यात मारली आणि मुख्य दरवाजाच्या ठिकाणी अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता.

आधी वडिल,नंतर आजोबा आता आईचा मृत्यू,असे संकट पाहणाऱ्या जलतरणपटूची करूण कहाणी!
खानदेशात उन्हाळी कपाशी लागवड सुरू..!

सहा महिन्यातच कुटुंब उद्ध्वस्त..

मुकेश व योगिता सोनार यांचा एकुलता एक मुलगा आर्यन, आई-वडील व एक भाऊ असे सुखी कुटुंब होते. मुकेश सोनार सोनारी काम करीत होते. पण सहा महिन्यांपूर्वी यावल येथे मुकेश यांचा अपघातात मृत्यू झाला. सोनार कुटुंब हे संकट सहन करत नाही, तोच मुकेश यांचे वडील लोटन सोनार यांचा पुत्रविरहाने सोळा दिवसांत हृदयविकाराने मृत्यू झाला. असे दुहेरी संकट सहन करून जगत असताना शुक्रवारी हे कुटुंब उद्ध्वस्त झाले.

आधी वडिल,नंतर आजोबा आता आईचा मृत्यू,असे संकट पाहणाऱ्या जलतरणपटूची करूण कहाणी!
अद्याप परतावा मिळालाच नाही..शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ !

जलतरणपटूचे स्वप्न धूसर..

आर्यन हा उत्तम जलतरणपटू असल्याने त्याला दररोज पहाटे मुकेश त्याला स्वीमिंगला घेऊन येणे, त्याला सोडणे, त्याला स्वीमिंगमध्ये करियर करण्याचे स्वप्न व मार्गदशन त्याचे वडील करत होते. परंतु मुकेश यांचा अपघातात मृत्यू झाला. पण आर्यनने जिद्द सोडली नाही. त्याची आई योगिता सोनार यांनी त्याच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द धरून सहा महिन्यांपासून आर्यनला स्वत: सकाळी उठून स्वीमिंग करण्यासाठी घेऊन जात होती. आर्यन हा उत्तम जलतरणपटू असून, शालेय, आंतरशालेय तसेच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत देखील खेळला आहे. त्यामुळे वडिलांपाठोपाठ आता मातृछत्र हरपल्याने उगवत्या जलतरणपटूचे स्वप्न धूसर झाले आहे. त्याला आता मदतीची गरज आहे. त्याला उमेद अन् खंबीर पाठबळ मिळाले आर्यन पुन्हा नव्या दमाने उभारी घेऊन स्वीमिंगमध्ये चांगली कामगिरी करू शकले. त्यासाठी हवाय फक्त मदतीचा हात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com