Cyber Crime News : सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ चिंताजनक; फेक अकाऊंट काढून बदनामी

सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
Cyber Crime News
Cyber Crime News esakal

Cyber Crime News : सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. प्रत्येकाजवळ नवीन तंत्रज्ञान सहजपणे असल्याने आपले काम सहज सोपे व्हावे म्हणून सोयीचे ठरणारे हे तंत्रज्ञान आज तितकेच डोकेदुखी देखील ठरत आहे.

तंत्रज्ञानाच्या वापराने जितके चांगले करता येईल, तितके चांगले करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, हा हेतू आहे.

मात्र, सध्या ‘फेसबुक’च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या नावे ‘फेक अकाउंट’ तयार करून त्याद्वारे त्याच्या मित्र परिवाराची फसवणूक व त्यांची बदनामी करण्याचे प्रकार वाढले आहेत. (massive increase in cybercrimes jalgaon cyber crime news)

‘सोशल मीडिया’वर ‘फेसबुक’च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून विशेषतः मुली आणि महिलांना बदनाम करण्याचे प्रकार वाढले आहेत.

त्यांनी फेसबुकवर अपलोड केलेल्या फोटोच्या आधारे दुसरे सेम अकाउंट तयार करून त्यांची बदनामी केली जात आहे. फेक अकाऊंट तयार करून त्याद्वारे पैशांची मागणी करणे हा प्रकार देखील आता जणू एक ट्रेंडच बनला आहे.

काही मुले मित्रांची चेष्टा करण्यासाठी मुलींचे अकाऊंट तयार करतात आणि त्या अकाऊंटद्वारे मित्रांशी मुलगी असल्याचे भासवत चॅटिंग करतात. मुलींचे फोटो शेअर करतात. यामुळे अनेकजण मानसिक दबावाखाली जात असल्याचे दिसून येत आहे.

दुसऱ्या बाजूला अनेक मुली देखील आपल्याच मैत्रिणींचेच फेक अकाऊंट काढून त्यांच्या बदनामीचे उद्योग करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cyber Crime News
Cyber Crime : सायबर चोरट्यांच्या मायाजालापासून सावधान! तक्रारींचे प्रमाण वाढतेय

जनजागृती करणे गरजेची

फेक अकाउंटबाबत फेसबुकला तक्रार केली तर अशी अकाऊंट ब्लॉक केली जातात. त्यामुळे फेक अकाऊंट असल्याचा संशय आल्यास तत्काळ सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवायला हवी. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने याबाबत तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. सोशल मीडियावरून मुली आणि महिलांच्या बदनामी, पैशांची मागणी असे प्रकार नित्याचेच होत असले तरी याबाबत गुन्हा नोंद होत नसल्याने या भामट्यांचे धाडस वाढतच आहे.

"तंत्रज्ञान जेवढे फायद्याचे तेवढेच नवीन पिढीला गुन्हेगारीकडे घेऊन जाण्यास कारणीभूत आहे. फेक अकाऊंट तयार करणाऱ्या आरोपीस आय. टी. अॅक्ट ६६ (सी),६६(डी) ६६(ई),६६(एफ) नुसार कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना आपल्याला जागरूक असणे आवश्यक आहे." -अॅड. अविनाश के.पाटील, नोटरी भारत सरकार, जळगाव.

"याच हप्त्यात माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. याबाबत मला मित्र परिवारातून फोन येऊ लागले, की तुमच्या फेसबुक अकाउंटवरून कोणी तरी पैशांची मागणी करीत आहे. मी लागलीच त्यांना फेसबुकवर रिपोर्ट करायला लावले व माझ्या मित्र परिवाराला मॅसेज करून फेसबुक अकाउंट हॅक झाले असल्याने रिक्वेस्ट स्वीकारू नये, असे सांगितले."- सुयश हिवाळे (फेसबुक अकाउंट हॅक झालेले व्यक्ती)

Cyber Crime News
Cyber Attacks : देशात आठवड्याला एका कंपनीवर होतात २,००० सायबर हल्ले; जगभरातील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com