esakal | जळगाव जिल्ह्यात..एका दिवसात लाखावर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

जळगाव जिल्ह्यात..एका दिवसात लाखावर लसीकरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव ः राज्यात मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर जळगाव जिल्ह्यात शनिवारी (ता. ४) एक लाख ३०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लशींच्या उपलब्धतेमुळे हे शक्य झाले आहे. गेल्या गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut)यांनी जिल्ह्यात एक लाखापेक्षा अधिक लस (Vaccine) उपलब्ध होतील, असे सांगितले होते. त्यानुसार लशींचा पुरवठाही झाला. यामुळे जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर लसीकरण (Vaccination Center) झाले.गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पन्नास हजारांच्यावर नागरिकांनी लस घेतली होती. जिल्ह्यात लशींचा पुरवठ्यात सातत्य राहिले तर लवकरच जिल्ह्यात सर्वांना लसीकरण होईल.

हेही वाचा: लस टोचल्यानंतर वृद्ध जागीच कोसळला..!‌

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण असे :
आकडे बोलतात..
* आरोग्य कर्मचारी- ५३ हजार ७७७
* फ्रंटलाइन वर्कर- एक लाख तीन हजार ८५८
* १८ ते ४५ वयोगटाचे- चार लाख ९१ हजार ९८६
* ४५ ते ६० वयोगटातील- चार लाख ६२ हजार ४९८
* ६० वर्षांवरील- चार लाख १४ हजार ९२८
* एकूण- १५ लाख २७ हजार ४७

हेही वाचा: कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता

बेघरांच्या लसीकरणाचे काय ?
जिल्ह्यात ज्यांचे आधारकार्ड आहे, त्यांचे लसीकरण होते. मात्र अनेक नागरिक बेघर आहेत. ज्यांना दोन वेळच्या खाण्याची चिंता असते, अशांकडे आधारकार्ड नाही. आधारकार्डाशिवाय लसीकरण केले जात नाही. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, अशांना लसीकरणासाठीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडे नाही. तो त्यांनी जाहीर केला, तर बेघर नागरिकांचे (आधारकार्ड नसलेल्यांचे) लसीकरण होईल.

loading image
go to top