
जळगाव : वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून दुचाकीने घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ तोडून चोरटे पसार झाले होते. अकोला येथील हॉटेल सेंटर प्लाझा जवळच घडलेल्या या घटनेतील संशयितांना आज (ता.१९) जळगाव शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
अकोला शहरातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे वाढदिवसाच्या कार्यक्रम आटोपून पस्तीस वर्षीय गृहिणी दुचाकीने घरी परतत होत्या. त्यावेळी अज्ञात ट्रिपलसीट दुचाकीवर आलेल्या गुंडांनी गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पसार झाल्याची घटना घडली होती.(Maximum number of Jalgaon thieves in Akola Arrested in case of theft gold jewelry of 2.5 lakhs Jalgaon Crime News)
या संदर्भात अकोला जिल्हा सिव्हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अकोला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी केली असता यातील चोरटे जळगाव शहरातील असल्याची माहिती मिळाली असे शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
निरीक्षक भागवत यांच्यासह सहाय्यक फौजदार परीस जाधव, विजय निकम, अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील यांच्या पथकाने ममुराबादरोडवरील प्रजापत नगरातील आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २६) याला कुसुंबा येथून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर दोन साथीदारांची नावे सांगितले.
त्यात दीपक रमेश शिरसाठ (वय २६ रा. वरखेडी ता. पाचोरा) आणि लोकेश महाजन (रा. खेडी ता. जळगाव) व तो स्वत: अशा तिघांनी मिळून अकोला जिल्ह्यात एकूण ९ चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यातील दुसरा साथीदार दीपक शिरसाठ याला जळगावातील कासारवाडी येथून अटक केली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी (क्रमांक : एमएच १४ केजी ७१९९) जप्त करण्यात आली. तिसरा संशयित लोकेश महाजन हा फरार आहे. अटकेतील दोन्ही गुन्हेगारांना अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.