Latest Marathi News | महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा; दिलीप पोकळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Political News : महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा; दिलीप पोकळे

जळगाव : महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे एकाच चिन्हावर निवडून आले आहेत. गेल्या २२ महिन्यांपासून जळगावच्या विकासाबाबत ते जनतेची दिशाभूल करीत आहेत.

जळगावातील खड्ड्यातील रस्ते, अस्वच्छता याला तेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी महापालिकेतील शिंदे गटाचे नगरसेवक दिलीप पोकळे यांनी केली आहे. (Mayor opposition leaders should resign Statement of Dilip Pokale Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon News : अवाजवी मालमत्ता कराच्या हरकतींवर 20, 21 ला सुनावणी

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की खराब रस्ते ही जळगाव शहरातील सर्वांत मोठी समस्या आहे. शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी देऊनही आपण ते खर्च करू शकले नाहीत. शहराच्या विकासात अपयशी ठरले आहेत.

मात्र, अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. प्रस्तावात त्रुटी कशा राहत आहेत, त्याकडेही लक्ष दिले जात नाही. प्रशासनावर कोणाचीच पकड नाही. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांना आज अनेक समस्यांशी सामना करण्याची वेळ आली आहे.

महापालिकेत विरोधी पक्षनेता नाही, असे वाटते. कारण महापौर व विरोधी पक्षनेता एकाच पक्षाचा आहे. अपयश लपविण्याचा दोघांकडून प्रयत्न होत आहे. त्यांनी शहराचा विकास करावा. जनतेची दिशाभूल करू नये, अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही ॲड. दिलीप पोकळे यांनी केली आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: Jalagon News : चोपडा पालिकेचे अधिकारी रडारवर!; सफाई कंत्राटातील अनियमितता सिद्ध