Jalgaon News : एमबीए, एमसीए पदवीधरांचीही मेट्रोज्‌कडे धाव!

College Students
College Studentsesakal

जळगाव : शहरासह जिल्ह्यात विकासाची (Development) प्रक्रिया थांबल्याने जिल्ह्यातील ‘ब्रेन ड्रेन’ सुरूच आहे. गेल्या दशकात हे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. (MBA MCA graduates are also migrating to metros for jobs in big cities jalgaon news)

दर वर्षी अभियांत्रिकीची पदवी घेतलेले दोन हजारांवर तरुण नोकरीसाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करीत असल्याचे समोर आल्यानंतर एमबीए, एमसीएच्या पदवीधरांनीही नोकरीसाठी ‘मेट्रोज्‌’ची कास धरल्याचे तज्ज्ञ सांगतात.

अर्थात, व्यवस्थापनातील पदवीधरांची महानगरांकडे ओढ असली, तरी येथील स्थानिक व्यावसायिकांची मुले मात्र पदवी प्राप्त करून आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळण्यात किंबहुना त्या व्यवसायात आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून वृद्धी करण्यात ‘इंटरेस्ट’ घेत असल्याचे सकारात्मक चित्रही समोर आले आहे.

जळगाव जिल्ह्यात व्यवस्थापनातील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारी पाच-सहा प्रमुख महाविद्यालये आहेत. त्यापैकी केसीई सोसायटीचे आयएमआर, रायसोनींचे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, एसएसबीटीचे महाविद्यालय, गोदावरी फाउंडेशनचे मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च महाविद्यालय यांसारख्या शैक्षणिक संस्थांनी जळगाव जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्षेत्रातही मॅनजमेंट क्षेत्रातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

College Students
Jalgaon News : मनपा देणार जिल्हा बँकेला दणका!

‘मॅनेजमेंट’कडे वाढता कल

अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील शिक्षणाप्रमाणेच वाणिज्य व अन्य शाखांमधील विद्यार्थ्यांचा व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षणाकडे कल वाढू लागला आहे. एकतर या क्षेत्रात मोठ्या महानगरांमध्ये (मेट्रोज्‌) चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. दुसरीकडे फार्मसीतील पदवी प्राप्त केल्यानंतर मॅनेजमेंटची पदवी घेत या क्षेत्रात करिअर घडविणारे अनेक पदवीधर आहेत.

‘फायनान्स’मध्ये विशेष रस

एकीकडे व्यवस्थापन अभ्यासक्रमाकडे कल वाढत असताना, विद्यार्थी त्यातील स्पेशालिटी म्हणून ‘फायनान्स’मध्ये रस घेऊ लागले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात या अभ्यासक्रमाला अलीकडच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले असून, जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही त्याकडे कल वाढतोय.

पण; इथं नोकरी नाही

जळगाव जिल्ह्यातून दर वर्षी जवळपास आठशे ते हजार विद्यार्थी मॅनेजमेंटमधील पदवी घेऊन बाहेर पडतात. काही जण सरकारी नोकरी म्हणून बँकिंग क्षेत्राकडे वळतात; पण त्याठिकाणच्या नोकरीला मर्यादा आहेत. जळगाव जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय क्षेत्र विकसित नाही. उलटपक्षी त्याला उतरती कळा लागलीय. त्यामुळे स्थानिक ठिकाणी संधी नसल्याने मॅनेजमेंट पदवीधरांचाही ओढा मुंबई, पुण्यासह, औरंगाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, अशा मोठ्या शहरांकडे वाढला आहे.

College Students
Jalgaon News : मनपा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला कनिष्ठांकडून वाटण्याच्या अक्षदा!

वडिलोपार्जित व्यवसायात ज्ञानाची गुंतवणूक

मॅनेजमेंट क्षेत्रातील पदवीधरांचे महानगरांकडे ‘ब्रेन ड्रेन’ होत असल्याचे चित्र स्वाभाविक म्हणावे लागेल. मात्र, स्थानिक व्यावसायिकांच्या मुलांनी या क्षेत्रात करिअर केले, तर ते आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळताना दिसत आहेत. किंबहुना आपले मॅनेजमेंटमधील शिक्षणाचे ज्ञान स्वत:चा वडिलोपार्जित व्यवसाय विकसित करण्यासाठी वापरत आहेत.

"आपल्याकडील जवळपास ७० टक्के मॅनेजमेंटचे पदवीधर नोकरी अथवा उच्च शिक्षणासाठी महानगरांत स्थलांतरित होत आहेत. आपल्यासाठी हे चांगले चित्र नाही. त्यामुळे जिल्ह्यात औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे." -प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे

"मॅनेजमेंटमधील पदवीधर नोकरीसाठी मोठ्या महानगरांकडे वळत असले, तरी ते प्रमाण ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. आमच्या महाविद्यालयातील निम्म्याहून अधिक पदवीधर त्यांचा स्थानिक व्यवसाय सांभाळत असून, त्यात वृद्धी कशी करायची, यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत आहेत." -प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

College Students
Jupiter Venus Conjunction : सूर्यास्तानंतर अद्‌भुत खगोलीय घटना दिसणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com