Jalgaon : 7 महिन्यांपासून बंद विमानसेवेबाबत लवकरच दिल्लीत बैठक

Air Service
Air Serviceesakal

जळगाव : जळगावची बंद पडलेली विमानसेवा उडान योजनेंतर्गत सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विमानसेवा सुरू करण्यासाठी संबंधित विमान कंपन्यांची बैठक बोलावून तत्काळ विमानसेवा सुरू करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी, तर खासदार उन्मेश पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बुधवारी (ता. २) मुंबईत चर्चा करणार आहेत.

‘जळगावकरांचे विमान सात महिन्यांपासून जमिनीवर’ या आशयाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये सोमवारी (ता. १) प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी सांगितले, की विमानसेवेमुळे जळगाव व मुंबईतील अंतर कमी होते. काही तासांत जळगावमधील उद्योजक, डॉक्टर, वकील, अन्य कोणीही आपल्या कामासाठी मुंबईला येऊ शकतो. (Meeting held Soon in Delhi regarding of air services for 7 months Guardian Minister today Discussion Chief Minister Deputy Chief Minister Jalgaon News)

Air Service
Sushma Andhare : उद्धव ठाकरेंविरोधात कपटकारस्थान झाले, गुलाबराव तुम्हाला पाझर का फुटला नाही?

त्याच्या वेळेत बचत होते. यामुळे उडान योजनेंतर्गत विमानसेवा सुरू होण्यासाठी मीही आग्रही आहे. केंद्रात भाजपचे शासन आहे, तर राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपची सत्ता आहे. यामुळे या योजनेंतर्गत विमान सुरू करण्यासाठी आज किंवा उद्या मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करू.

खासदार उन्मेश पाटील म्हणाले, की जळगावच्या विमानतळावर अनेक सुविधा आहेत. रात्रीही विमानाचे लँडिंग, उड्डाणाची सुविधा आहे. ट्रूजेट कंपनीने विमानसेवा बंद केल्यानंतर नवीन कंपनीला कंत्राट देण्याबाबत बुधवारी (ता. २) उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करू. बंद पडलेल्या या सेवेबाबत उडान योजनेच्या कमिटीची या महिन्यात दिल्लीला बैठक होणार आहे. या बैठकीत जळगावला सेवा देण्यासाठी इच्छुक असलेल्या कंपन्यांशी थेट आमनेसामने चर्चा होणार आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्र्यांची तारीख लवकरच मिळेल.

Air Service
Exclusive Story : आजोबा, आजीच्या लग्नात नातवंडांच्या अक्षदा

मार्च महिन्यापासून जळगावची विमानसेवा बंद असल्यामुळे, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तीन वर्षांपूर्वी उडान योजनेंतर्गत हैदराबाद येथील ट्रूजेट या विमान कंपनीने जळगावची विमानसेवा सुरू केली होती. अपेक्षित प्रवासीसंख्या मिळत नसल्यामुळे आर्थिक तोटा झाल्याचे सांगत, विमान कंपनीने जळगावची सेवा बंद केली आहे.

लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची

विमानसेवा सल्लागार समितीचे उद्योजकांचे सदस्य प्रेम कोगटा यांनी सांगितले, की विमानसेवा बंद झाल्याने व्यापारी, उद्योजकांना मुंबईला जाण्यासाठी अनेक तासांचा अमूल्य वेळ वाया घालवावा लागत आहे. विमानसेवा सुरू असती तर एक ते दीड तासात मुंबईला पोचता येते. जिल्ह्यातील मंत्री, खासदार यांची भूमिका यात महत्त्वाची आहे. ते कशा पद्धतीने विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करतात त्यावर विमानसेवेचे भविष्य अवलंबून आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने दोन्ही खासदारांनी सक्षम पाठपुरावा करून पुन्हा विमानसेवेचा श्रीगणेशा करावा.

Air Service
Adv Zubair Shaikh Statement : पदवीधरांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी मतदार नोंदणी करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com