
Diwali 2023 : यंदाचा दीपोत्सव रसिकांसाठी अनोखी मेजवानी घेऊन येतोय.. दिवाळी पहाट परिवर्तनच्या तालवाद्यासह गायनाच्या मैफिलीने तर चांदोरकर प्रतिष्ठान दरवर्षाप्रमाणे पाडव्याची पहाट एका खास मैफिलीने रम्य करणार आहे.(melodious feast of Diwali Padwa on 12 november in jalgaon news)
परिवर्तनची रविवारी ‘दिवाळी पहाट’
नरक चतुर्दशीच्या दिवशी तालासुरांसह स्वरांनी दिवाळीचे स्वागत ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाद्वारे रविवारी (ता.१२) केले जाणार आहे. या सांगीतिक मैफलीत गायिका ऐश्वर्या परदेशी, स्वानंद देशमुख, गायक व संवादिनीवादक गोविंद मोकाशी गायन करणार आहेत.
साथसंगत करणाऱ्या कलावंतामध्ये तबल्यावर भूषण गुरव, कीबोर्ड गौरव काळंगे, हँडसोनिकवर रोहित बोरसे तर अनुज पाटील हे पखवाजची साथसंगत करणार आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमाची संकल्पना भूषण गुरव यांची असून कार्यक्रमाचे दिग्दर्शन मंजूषा भिडे यांनी केले आहे.
निर्मिती नारायण बाविस्कर, विनोद पाटील यांची असून होरीलसिंग राजपूत व मंगेश कुळकर्णी हे कार्यक्रमाचे सूत्रधार आहेत. नरकचुर्दशीच्या दिवशी पहाटे ६ वा. भाऊंचे उद्यानात ही मैफल होणार आहे.
चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित ‘पाडवा पहाट’
कला व संस्कृती संचालनालय गोवा, व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट या प्रातःकालीन मैफिलीचे आयोजन बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला मंगळवारी (ता.१४) करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन सभा महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या वर्षी मुग्धा गावकर व प्राची जठार या दोन प्रतिभासंपन्न युवती आपली कला जळगावकर रसिकांसमोर सादर करणार आहेत. या दोन स्वरसखींना ऋषिकेश फडके (तबला), दत्तराज सुरलकर (संवादिनी), पंकज सायनेकर (बासरी) साथसंगत करतील. निवेदन आकाशवाणी पणजीच्या उदघोषिका मानसी वाळवे या करणार आहेत. कार्यक्रम ठीक ६ वाजता सुरू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.