एकटा रडत बसलेला पाहून प्रवाशांना आली शंका; पोलीस आले आणि लावला शोध !

चेतन चौधरी 
Saturday, 16 January 2021

पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या 10 वर्षाच्या मुलाला पोलिस ठाण्यात आणले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता तो खुप घाबरला होता.

भुसावळ : भुसावळ शहरात बस स्थानकवर एक 10 वर्षाचा मुलगा बऱ्याच वेळापासून एकटा बसलेला होता तो रडत असल्याने काही प्रवाशांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी लागलीच धाव घेत या मुलास विचारपूस करून त्याला बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले यानंतर त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्यास आज आपल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आवश्य वाचा- कोरोनाच्या लसीकरणामुळे सर्वसामान्यांच्या मनातील भिती होणार दुर !
 
बस स्थानकावर काल (ता. 15) दुपारी तीनच्या सुमारास लहान मुलगा रोहन विकास सुरवाडे (वय-10 रा.भिम नगर मलकापुर जि. बुलढाणा) हा एकटा खुप वेळापासुन बसलेला आहे व तो खुप रडत असल्याची पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना फोन आला. तेव्हा त्यांनी लागलीच सहाय्यक फौजदार तस्लीम पठाण पो.हे.कॉ. मिलींद कंक, वाल्मीक सोनवणे पो.ना.संदिप परदेशी ,सुभान तडवी,रमन सुळकर पो.कॉ. कृष्णा देशमुख ,किशोर मोरे ,सचिन चौधरी हे बस स्थानकावर आले

बालक घाबरलेला...

पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या 10 वर्षाच्या मुलाला पोलिस ठाण्यात आणले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता तो खुप घाबरला असल्याने त्याला त्याचे नाव गाव सांगता येत नव्हते.

आवर्जून वाचा- शिजवलेले चिकन, उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित; जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष सुरू 
 

आणि सापडला पत्ता

तेव्हा माहीती गारांना कामाला लावुन त्या मुलाची माहीती काढली तेव्हा त्या मुलाचे नाव रोहन विकास सुरवाडे (वय-10 रा.भिम नगर मलकापुर जि. बुलढाणा) असे समजले. तसेच त्या मुलाचे आई वडील हे दोघे वारले असुन तो त्याच्या काकाकडे राहत होता व हे दोघे भुसावळ मध्ये काही कामानिमीत आले होते. रोहन हा गर्दिच्या ठिकाणी हरवुन गेल्याचे समजले. तेव्हा त्या मुलाचे काका विजय गणपत सुरवाडे (वय – 42 रा.भिम नगर मलकापुर जि.बुलडाणा) यांच्याशी संपर्क साधला व त्या मुलाला त्याच्या काकाच्या ताब्यात देण्यात आले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: messing marathi news bhusawal ten year boy missing police searched