Anil Patil : देशाच्या स्वातंत्र्यात अमळनेरच्या मातीचे मोठे योगदान : मंत्री अनिल पाटील

Relief and Rehabilitation Minister Anil Patil speaking at the concluding program under the 'Meri Mati Mera Desh' campaign. Mahadev Khedkar, Rupesh Kumar Surana etc. on the platform.
Relief and Rehabilitation Minister Anil Patil speaking at the concluding program under the 'Meri Mati Mera Desh' campaign. Mahadev Khedkar, Rupesh Kumar Surana etc. on the platform.esakal

Anil Patil : देशाच्या स्वातंत्र्यात अमळनेर तालुक्याच्या मातीचे योगदान होते. या मातीच्या कणाकणात जनतेच्या भावना गुंतल्या आहेत. ही माती संस्कारांनी भरली आहे. त्यामुळे अमळनेरचा कलश प्रेरणा देणारा आहे.

आज ही माती ‘अमृत’ कलशातून मुंबईहून दिल्लीला जात आहे, ही तालुक्याच्या दृष्टीने स्वाभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तालुक्याचा अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींकडे सोपविताना केले.(Minister Anil Patil statement on contribution of Amalner in country independence jalgaon news)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप करण्यात येत असून, तालुक्यातील प्रत्येक गावातून मूठभर माती कलशातून संकलित करून ती एकत्रितरित्या तालुक्याच्या अमृत कलशातून दिल्ली येथे पाठविण्यात येत आहे.

पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या पूजनाने झाले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, बाजार समिती संचालक नितीन पाटील, प्रा. सुरेश पाटील हजर होते.

सुरुवातीला प्रातिनिधिक स्वरूपात वावडे, आटाळे, गडखांब, खेडीखुर्द, बोहरा, सुंदरपट्टी, एकरुखी, निंभोरा, धानोरा, महिला ग्रामसेवक व महिला मंडळ यांचे कलश मंत्री अनिल पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. त्यांनतर मंत्री पाटील यांनी तालुक्याचा अमृत कलश नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सागर कोळी, वैशाली शिंदे यांच्याकडे सोपवला.

Relief and Rehabilitation Minister Anil Patil speaking at the concluding program under the 'Meri Mati Mera Desh' campaign. Mahadev Khedkar, Rupesh Kumar Surana etc. on the platform.
Jalgaon News : महापालिका 86 कंत्राटी पदासाठी अडीच हजार अर्ज

सुरुवातीला ग्रामसेवक संघटना, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागातर्फे मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविस्तार अधिकारी एस. एस. कठळे यांनी आभार मानले.

सानेगुरुजी कन्या शाळेच्या विद्यर्थिनींनी इशस्तवन स्वागतगीत म्हटले. कार्यक्रमास विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे, सचिन नितीन पाटील, कैलास पाटील, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Relief and Rehabilitation Minister Anil Patil speaking at the concluding program under the 'Meri Mati Mera Desh' campaign. Mahadev Khedkar, Rupesh Kumar Surana etc. on the platform.
Jalgaon News : ‘बायपास’ सुसाट, महामार्गावर खड्डेच खड्डे; महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com