Jalgaon News: खेडीकढोली शिवारात साकारणार ‘मियावाकी’ वन! साडेसात हजार झाडांचा प्रकल्प

Miyavaki Jungle
Miyavaki Jungleesakal

Jalgaon News : मुलांच्या कौशल्यवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या चेन्नई येथील एसआयपी आणि जळगावच्या पर्यावरण शाळेतर्फे खेडीकढोली शिवार (ता. एरंडोल) येथे मियावाकी वनसंवर्धन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे.

मंगळवारी (ता. ११) हा कार्यक्रम होणार असून, या परिसरात सुमारे साडेसात हजार वृक्षलागवड करून वन साकारण्यात येणार आहे. (Miyawaki One will be played in Khedikdholi Shivar Seven half thousand trees project Jalgaon News)

मंगळवारी सकाळी नऊला प्रकल्पाचा प्रारंभ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, जिल्हाधिकारी अमन मित्तल, खासदार उन्मेष पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील,

जळगावचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, एसआयपी अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर, संचालक सी. बी. शेखर, संचालिका सरला कुलशेखरन, शिवाकाशी येथे २५पेक्षा अधिक मियावाकी वन निर्माण करणारे सेलवाकुमार यांच्या उपस्थितीत होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Miyavaki Jungle
Milch Animals Auction: वडांगळी येथे दुभत्या जनावरांचा लिलाव : आमदार वाजे

चार महिन्यांपासून काम

गेल्या चार महिन्यांपासून या प्रकल्पाचे प्रारंभिक काम सुरू आहे. या उपक्रमाला भारत विकास परिषद, बळवंत नागरी सहकारी पतपेढी, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सक्रिय सहकार्य लाभले आहे.

याप्रसंगी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन या उपक्रमाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.

साडेसात हजार झाडांचे वन

लोकसहभागातून हा प्रकल्प येत्या मंगळवारी साकार होत असून, या ठिकाणी स्थानिक प्रजातींच्या साडेसात हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

Miyavaki Jungle
Nashik News: सरण ही थकले मरण पाहुणी...; मरणानंतरही भोगाव्या लागतात नरकयातना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com