Jalgaon News : ‘पाडळसरे’ धरणाकडे सत्ताधाऱ्यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष; आमदार अनिल पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Anil Patil statement about neglect of Padalsare dam by the rulers jalgaon news

Jalgaon News : ‘पाडळसरे’ धरणाकडे सत्ताधाऱ्यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष; आमदार अनिल पाटील

कळमसरे (जि. जळगाव) : पाडळसरे धरण हे खानदेशातील सहा तालुक्यांना संजीवनी ठरणारे धरण आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडा, शिरपूर, धुळे

या सर्व ठिकाणी सत्तेत असलेल्या आमदारांची संख्या जास्त असूनदेखील या धरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत आमदार अनिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. (MLA Anil Patil statement about neglect of Padalsare dam by the rulers jalgaon news)

गेल्या वेळीस जिल्ह्याकडे जलसंपदा खाते असताना ३० कोटी, ३५ कोटी एवढाच निधी या प्रकल्पाला मिळत होता. आघाडी सरकारच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला होता.

मात्र शिंदे -फडणवीस सरकारने यंदा या प्रकल्पास केवळ १०० कोटींची तरतूद करीत संपूर्ण खानदेशवासीयांची थट्टाच केली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

पाडळसरे येथे विविध विकासकामाच्या उद्घाटन कार्यक्रमास ते आले असता यावेळी त्यांनी पाडळसरे धरणाला धावती भेट संबंधित अधिकारी यांच्याकडून सुरू असलेल्या कामाची माहित जाणून घेतली, तेव्हा ते बोलत होते. या वेळी भागवत पाटील, सचिन पाटील, जितेंद्र राजपूत, भूषण पाटील, वसंतराव पाटील, शत्रूग्न पाटील पाडळसरे धरणाचे अभियंता यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaondam